Delhi: दिल्ली च्या त्यागराज स्टेडियममध्ये (Tyagraj Stadium) कुत्र्याला फिरवणे IAS दाम्पत्यांना महागात पडले आहे. कुत्र्याला फिरवण्याचा मुद्द्यावर मीडिया मध्ये खूप चर्चा झाली. म्हणून गृहमंत्रीनी दोन्ही IAS अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कुत्रा फिरवण्याचा आरोप करत दोन्ही IAS दाम्पत्य संजीव खिरवार (Sanjay Khirwar) आणि रिंकू दुग्गा (Rinku Dugga) यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली केली आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, संजीव खिरवार यांची लडाखमध्ये (Ladakh) आणि त्यांच्या पत्नी रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) बदली करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी 1994 च्या बॅचचे आहेत.
कुत्र्यांना फिरवायला यायचे IAS अधिकारी
दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक सतत तक्रार करत होते की त्यांना स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेण्यापासून रोखले जात आहे. त्यामागील कारण म्हणजे दिल्लीचे प्रधान सचिव संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी कुत्र्यांना फिरवण्यासाठी स्टेडियम मध्ये घेऊन यायचे.
पहारेकरी त्यांना स्टेडियम बाहेर काढायचे
ऍथलिट आणि प्रशिक्षक यांनी आरोप केला होता की ते आधी रात्री 8-8.30 वाजेपर्यंत स्टेडियममध्ये सराव करत असे. मात्र जेव्हापासून अधिकारी दांपत्य कुत्र्यांना फिरवण्यासाठी यायला लागले तेव्हापासून पहारेकरी त्यांना ७ वाजताच स्टेडियम मधून बाहेर काढायचे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत
विशेष म्हणजे ही बाब समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी दिल्ली सरकारच्या अंतर्गत येणारे सर्व स्टेडियम्स खेळाडूंसाठी रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश दिले आहेत.