डोंबिवली (शंकर जाधव)
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील राजलक्ष्मी आर्ट ज्वेलर्स दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसात तिसरी घटना असून या घटनेत बाजूच्या बंद दुकानातील गाळयातून चोरट्याने भिंत फाडून ज्वेलर्स दुकानात शिरण्याचा प्रयत्न अखेर असफल ठरला.
‘वाचाल तर वाचाल’ संदेश दिंडी विद्यार्थ्यांसह मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सहभाग
या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश सोनी यांनी डोंबिवलीतील ज्वेलर्स दुकान सुरक्षित नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावर असलेल्या या दोन्ही दुकानांचे समोरून शटर उचकून फोडल्याने पोलीस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, डोंबिवली परिसरात ज्वेलर्स व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.