डोंबिवली (शंकर जाधव) कोकणातील पारंपारिक उत्सव नारळ लढविणे व सलामी दहीहंडी गेली १७ वर्ष अखिल कोकण विकास महासंघ डोंबिवलीच्या वतीने जतन केले आहे. डोंबिवली शहर हे सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख आणि अशा शहरात कोकणातील पारंपारिक उत्सवाचा आदर्श कोकणातील तरुण पिढीला ज्ञात व्हावा या उद्देशाने संस्थापक तानाजी परब तसेच मंडळाचे पदाधिकारी यांनी नारळी पौर्णिमा दिनी डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवर हा उत्सव साजरा केला.

यावेळी उत्सवात केबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून नारळ लढविला. बरोबर अखिल कोकण विकास महासंघाचे पदाधिकारी ही खेळले. सायंकाळी चोर दहीहंडीसाठी अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला. गोविंदा पथकांना सलामी देताना पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. यावेळी महासंघाचे संस्थापक परब, खजिनदार किरण सरवणकर, सहसचिव महेश राउळ, नरेंद्र लोटेगावकर, सल्लागार प्रकाश चिले, प्राग राणे यांसह राष्ट्रवादीचे डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी, माजी नगरसेवक नंदू मालवणकर, संदीप देसाई, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर आदि मान्यवर उपस्थित होते. २४ जुलै रोजी चिपळूणला पूर आल्याने येथील स्थानिकांना अखिल कोकण विकास महासंघाचने मदतीचा हात पुढे केला होता. धान्य, मेडिकल अशा आवश्यक वस्तू येथील गावकऱ्यांनी दिल्या. तर पर्यावरणाचा संदेश देतमहासंघाने वृक्षारोपण केल्याची माहिती दिली.