29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
HomeKalyan-Dombivliरिजन्सी अनंतम मधील बायो गॅस प्रकल्पाचे उद्घाटन... स्ट्रीट लाईट वर येणारा विजेचा...

रिजन्सी अनंतम मधील बायो गॅस प्रकल्पाचे उद्घाटन… स्ट्रीट लाईट वर येणारा विजेचा खर्च देखील कमी करण्याचा प्रयत्न..

   

डोंबिवली (शंकर जाधव )

बायोगॅस प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती व प्रोत्साहन दिले जाते.यात खाजगी गृहासंकुलांचाही समावेश असावा यासाठी शासन प्रयत्नशील असते.डोंबिवलीतील गृह संकुल रिजन्सी अनंतम मध्ये उभारणाऱ्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.परिसरातील स्ट्रीट लाईट वर येणारा विजेचा खर्च देखील कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पाणी वाचवण्यासाठी आणि कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी जाहीर रित्या शप्पथ देखील घेतली.

 ज्यामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेवर पडणारा कचऱ्याचा भार थोड्याफार प्रमाणात कमी होईल. ओल्या कचऱ्याचे विघटन जागेवर करता येणं शक्य असल्यामुळे त्या गॅस मधून मिळणाऱ्या विजेमुळे त्या प्रकल्पाची मशीन तर कार्यरत राहीलच पण त्यासोबतच परिसरातील स्ट्रीट लाईट वर येणारा विजेचा खर्च देखील कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते  बायोगॅस प्रकल्पाच्या मशीनचे उदघाटन करण्यात आले. यावेळी महेश अग्रवाल, अनिल भटिजा, उद्धव रूपचंदानी, विकी रूपचंदानी, संतोष डावखर तसेच रिजन्सी अनंतम मधील रहिवाशी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. बायोगॅस प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले. ‘पाणी वाचवा’  विषयावर एक  रिजन्सी अनंतम मधील रहिवाशांनी माहीती दिली. यावेळी बायोगॅस प्रकल्प या विषयावर चित्रकला व पोस्टर स्पर्धेत  विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एकूण दहा हजार रुपये ची रोख बक्षिसे आणि ट्रॉफी देण्यात आली. ज्यामध्ये आपली कला रेखाटून वेदांत राणे व रुद्रा पराडकर यांनी प्रथम, अथर्व वाणी व मनुष् कलवारी यांनी द्वितीय, प्रणव येवले व तनिष्का निर्गुण यांनी तृतीय पारितोषिक पटकाविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »