29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी Income Tax Return: यंदा मुदतवाढ नाही, ITR भरण्याची अंतिम तारीख निश्चित

Income Tax Return: यंदा मुदतवाढ नाही, ITR भरण्याची अंतिम तारीख निश्चित

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ आहे हे ऐकून काहींना टेन्शन आलं असेल. काही लोकांनी असा समज केला असेल की सरकार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवेल. पण यंदा असे काहीही होणार नाही.गेल्या दोन आर्थिक वर्षांत, सरकारने कोविड-१९ साथीच्या आजाराशी लढा देणाऱ्या करदात्यांना दिलासा दिला होता. सरकारने आयटीआर भरण्याची मुदत वाढवली होती. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. यावेळी कोणतेही मानवतावादी संकट नाही. त्यामुळे केंद्र सरकार आयटीआरची (Income tax return) मुदत वाढवण्याचा विचार करत नाही. त्यामुळे कालमर्यादेत आयकर रिटर्न दाखल करा. नाहीतर तुम्हाला दंडासह इतर कायदेशीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे. मात्र गेल्या काही वर्षांत सरकारने मुदत वाढवून दिली होती. मग कारणं वेगळी होती. त्यावेळी जागतिक मानवतावादी संकट होते. मात्र, यंदा कोणतेही मोठे कारण नाही. त्यामुळे आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा विचार सरकार करत नसल्याचे महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले.
आयकर विभागाच्या (ITD) नियमांनुसार, वैयक्तिक करदाते – ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नसते, त्यांना आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत पुढील आर्थिक वर्षाची ३१ जुलै आहे.

आता कर भरणे सोपे झाले आहे आणि परतावा जलद मिळत आहे. आयकर विभागाने कर भरणा सुलभ करण्यासाठी नवीन आय-टी फाइलिंग पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे अतिरिक्त भार टळला आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, करदात्यांकडून मिळालेला प्रतिसाद चांगला आहे.

गेल्या वेळी ५० लाखांहून अधिक लोकांनी आयकर विभागाकडे कर भरले होते. यावर्षी आम्ही शेवटच्या तारखेला 1 कोटी करदात्यांसाठी तयारी झाली आहे. यावर्षी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही असे देखील बजाज यांनी म्हटले आहे.

मागील आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ३१ डिसेंबर २०२१ च्या वाढीव देय तारखेपर्यंत सुमारे ५.८९ कोटी ITR दाखल करण्यात आले होते. आयटीआरच्या माध्यमातून एखादी व्यक्ती भारताच्या आयकर विभागाकडे सादर करायची असते. हे एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षात व्यक्तीचे उत्पन्न आणि त्याच्यावर देय कर याविषयी माहिती देते.

जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्याला/तिला कर विवरणपत्र भरावे लागेल. नवीन कर प्रणालीनुसार, सूट मर्यादा २.५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. पूर्वीच्या नियमांनुसार, ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी सूट मर्यादा २.५ लाख रुपये आहे. ६० ते ८० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये आणि ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये सूट मर्यादा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »