राज ठाकरे यांनी सभेत प्रकट केलेल्या मशिदीवरील भोंग्यांचा विषय देशात सध्या वादाचा विषय ठरला आहे.
या मशिदींच्या भोंग्या मागे नक्की काय इतिहास आहे? हे आपण जाणून घेऊयात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लाऊडस्पीकर (loudspeaker) चा शोध लागला आणि १९३० च्या दशकात अझान म्हणजे मुस्लिमांची प्रार्थना आणि काही वेळा खुदबा म्हणजे काही उपदेश किंवा संदेश देण्यासाठी ते मशिदींमध्ये सुरू झाले. लाऊडस्पीकर वरील अझान हे मुस्लिम प्रार्थनेसाठी बोलावण्यासाठीचे माध्यम आहे जे मशिदीतून ५ वेळा केले जाते. प्रेषित मुहम्मद यांनी मदिना येथे स्थलांतर केल्यावर त्यांनी ही प्रथा सुरू केली आणि तेथे मशीद बांधली. नमाजासाठी लोकांना मशिदीत बोलावण्याच्या पद्धतीबद्दल त्यांनी आपल्या साथीदारांसोबत या समस्येवर चर्चा केली. काहींनी घंटा वाजवण्याचा, काहींनी हाॅर्न (horn) वाजवण्याचा, तर काहींनी आग लावण्याचा सल्ला दिला परंतु पैगंबर याने मानवी आवाज निश्चित केला आणि एका बिलाल ची निवड केली. मानवी आवाज असल्याकारणाने तो दूरवर जाऊ शकत नव्हता म्हणून त्यांनी लाऊडस्पीकरवर अझान लावण्यास सुरुवात केली. लाऊडस्पीकर हे सहसा उंच मिनारांवर बसवलेले व अझानसाठी दिवसातून ५ वेळा वापरले जातात. पहिली अझान पहाटे पाचच्या ठोक्याला होते. काही मशिदींमध्ये ५ किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू येण्याइतपत शक्तिशाली लाऊडस्पीकर असतात.
मायक्रोफोन (microphone) लाऊड स्पीकर सेट ची पहिली ज्ञात स्थापना १९३६ मध्ये सिंगापूरमधील सुलतान मशिद येथे झाली. तुर्कस्तान आणि मोरॉक्को यांसारख्या देशांमध्ये विद्युत दृष्ट्या वाढीव अजान सामान्य झाली आहे, तर नेदरलँड सारख्या इतर देशांमध्ये फक्त ७ ते ८% टक्के मशिदी प्रार्थनेसाठी लाउडस्पीकर वापरतात.
आधुनिक मशिदीचे लाऊडस्पीकर निर्माण करू शकतील अशा उच्च व्हाॅल्यूममुळे (volume) मुळे सौदी अरेबियाच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयाने मे २०१९ च्या अखेरीस मशिदीतील लाऊड स्पीकर चा आवाज जास्तीत जास्त एक तृतीयांश पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी निर्देश जारी करण्यास प्रवृत्त केले. ही सूचना इस्लामिक राज्यामध्ये काही सामाजिक प्रतिक्रियेला सामोरे गेली आहे.
नेदरलॅंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, युके, ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि बेल्जियम या देशांमध्ये मुस्लिमांच्या प्रार्थनेच्या आवाहनावर मर्यादा आहेत, तर लागोस, नायजेरिया आणि यूएस मिशिगन राज्यातील काही समुदायांसह काही शहरांनी स्वतंत्रपणे मशीदींद्वारे लाऊडस्पीकर च्या वापरावर बंदी घातली आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये इस्राईलमध्ये धार्मिक संस्थांना विश्रांतीच्या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
१९९९ मध्ये मशिदींवरील लाऊडस्पीकरवर प्रस्तावित ब्लॅंकेट बंदीच्या चर्चेदरम्यान भारतातील काही राजकीय नेत्यांनी आरोप केला की लाऊड स्पीकर चा वापर जातीय तणाव निर्माण करण्यासाठी केला गेला होता आणि महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार येथे दंगल भडकवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला होता.
अझान बाबतीत गेल्या काही वर्षांपासून वाद निर्माण होत आहेत. अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांनी जिल्ह्या दंडाधिकाऱ्यांनी कडे तक्रार केली की पहाटेच्या अझानमुळे त्यांची झोप भंग पावते त्यामुळे त्यांच्या कामावर देखील याचा दुष्परिणाम होत आहे. तसेच एप्रिल २०१७ मध्ये प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनीही ट्विट (tweet) करत अझान बद्दलचे त्यांचे मत व्यक्त केले होते. ज्यात ते म्हणाले की, मी मुस्लिम नाही तरीही मला रोज सकाळी अझानच्या आवाजाने उठावे लागते. भारतातील ही सक्तीची धार्मिकता कधी संपणार? संगीतकार वजिद खान यांच्या ट्विटच्या टीकेला उत्तर म्हणून सोनू निगम आणखी एक ट्विट करत म्हणाले की, प्रार्थना स्थळांबद्दल निर्माण होणाऱ्या आवाजाबाबत आपण जे काही बोललो त्याबद्दल आपण माघार घेत नाही तुमची भूमिका तुमची स्वतःची बुद्धिमत्ता उघड करते. मशिदी आणि मंदिरांमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नये या माझ्या विधानावर मी ठाम आहे. तसेच लाऊड स्पीकर ची गरज नाही हे मान्य केल्याबद्दल त्यांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांचेही कौतुक केले.
२०२० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की जरी इस्लामिक धार्मिक प्रथेसाठी अझान आवश्यक आहे, परंतु लाऊडस्पीकरचा वापर नाही. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या २००० चर्च ऑफ गॉड ( 2000 church of god) विरुद्ध भारतातील चर्च ऑफ केकेआर मॅजेस्टिक ( church of KKR majestic) या निकालावर लक्ष वेधले ज्यामध्ये असे निदर्शनास आले की कोणताही धर्म किंवा धार्मिक संप्रदाय असा दावा करू शकत नाही की प्रार्थनेसाठी लाऊड स्पीकर किंवा त्यासारखी उपकरणे वापरणे हा त्या धर्माचा अत्यावश्यक भाग आहे. शेवटी लाऊड स्पीकर हा विसाव्या शतकातील शोध आहे परंतु धर्म हजारो वर्ष जुने आहेत. सप्टेंबर २०१८ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने रात्री १० वाजेनंतर लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी घातली आहे. २०१९ साली मशिदीवरील लाऊडस्पीकर वर आधारित शिवाजी पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’ नावाचा मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला होता.
ही सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर राज ठाकरेंनी घेतलेल्या ह्या भूमिकेवर तुमचे मत काय हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा.