29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
HomeखेळCricket : भारताचे हे खेळाडू फॅन्सच्या नेहमीच लक्षात राहतील... एक तर रडत...

Cricket : भारताचे हे खेळाडू फॅन्सच्या नेहमीच लक्षात राहतील… एक तर रडत ड्रेसिंग रूममध्ये गेला…

सध्या आयपीएलचे (IPL) वारे जोरदार वाहत आहेत, क्रिकेट म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय… शिवाय हल्ली मैदानाबाहेरचे किस्से लोकांना अधिक रंजक वाटू लागल्याने त्यावर सिनेमे, वेबसिरीज मोठ्या प्रमाणावर बनवले जात आहेत. भारताला नेहमीच खूप मोठमोठ्या आणि चांगल्या खेळाडूंचा इतिहास राहिला आहे. कित्येक नामवंत क्रिकेटर्सची कारकीर्द अनेकांना रेकॉर्डसह तोंडपाठ आहे. मात्र काही प्रतिभावान खेळाडू स्थानिक राजकारणामुळे किंवा स्वतःच्या व्यसनाधीनतेमुळे खेळ चांगला करूनही लोकांच्या समोर येता येता राहिले. या लेखात आपण अशा भारतीय क्रिकेटपटूबद्दल जाणून घेणार आहोत, वयाच्या चाळीशीनंतर क्रिकेटर म्हणून नावलौकिक मिळवलेला प्रवीण तांबे (Pravin Tambe) तर आता त्याच्या आयुष्यावर निघालेल्या सिनेमामुळे सर्वश्रुत झाला आहे.

आयुष्यातील २० वर्ष त्याने गल्ली क्रिकेटमध्ये तसेच स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये घालवली. क्रिकेटर म्हणून नावारूपाला येण्यासाठी आयुष्यातील ४१ वर्ष खर्ची करावी लागली. वयाच्या ४१ व्या वर्षी मिळालेल्या या संधीचे सोने करत तो अनेक तरुणांना आपल्या स्वप्नांच्या मागे सातत्याने धावण्याची प्रेरणा देत राहील. 


विनोद कांबळी 
या व्यतिरिक्त भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी ज्याला आपण सचिन तेंडुलकरचा मित्र म्हणून जास्त ओळखतो. विनोद कांबळी याची क्रिकेट कारकीर्द सुरुवात सचिनसोबतच सुरू झालेली. दोघांनी एकाच गुरूकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले पण दुर्दैवाने कांबळीला पुढे सचिन सारखी प्रसिद्धी नाही मिळवता आली. आपल्या खेळाच्या रूपाने सचिनने मिळवलेली प्रशंसा मिळवण्यात विनोद अपयशी ठरला. शालेय क्रिकेट सामन्यात सचिन व कांबळी या दोघांनी मिळून ६६४ धावा ठोकल्या होत्या. त्यांनी एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. ह्या भागीदारीत कांबळीने वैयक्तिक ३४९ धावा केल्या होत्या. याशिवाय विनोद कांबळीने आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता.
कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९९२-९३ मध्ये पदार्पण केले होते. टेस्टमध्ये १४ सामन्यात १००० धावा काढून सर्वात जलद हजार धावा पूर्ण करण्याचा मान कांबळीच्या नावावर होता. 
विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द जवळजवळ १० वर्षाची राहिली. या १० वर्षाच्या कालावधीत कांबळी सतत संघात आत बाहेर राहिला. १९९६ च्या वर्ल्डकप स्पर्धेत ईडन गार्डन्सवर श्रीलंके विरुद्ध उपांत्य फेरीचा डाव कोलमडला, त्यावेळी कांबळी ड्रेसिंग रूम मध्ये रडत गेला. याच सामन्यानंतर कांबळीचे करियर उतरणीला लागले. २००० या दरम्यान कांबळी शेवटची वनडे खेळला. 


परवेज रसूल
२०१२-१३ मध्ये परवेज रसूलने रणजी क्रिकेट मध्ये ५९४ रन बनवले आणि गोलंदाजी मध्ये पण शानदार प्रदर्शन दाखवून ३३ विकेट घेतले. त्यावेळेस भारतीय क्रिकेट टीम मध्ये अष्टपैलू (allrounder) खेळाडूची खूप गरज होती, घरेलू (domestic) क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करूनही त्याला भारतीय टीम मध्ये दुर्लक्षित केले गेले. परवेज रसूल याला भारतीय टीम मध्ये फक्त १ वनडे आणि १ टेस्ट खेळण्याचीच संधी मिळाली त्यावेळेस कॅप्टन व क्रिकेट बोर्डाने ठरवल असतं तर “परवेज रसूल’ याला बळकट स्थान देता आले असते, पण त्याच्याकडे कोणी लक्ष नाही दिले. त्यामुळे असा उत्कृष्ट खेळाडू खेळातील राजकारणाचा बळी पडून कायम प्रसिद्धी दूर राहिला.

धवल कुलकर्णी
भारतीय संघाला नेहमीच एक उत्कृष्ट दर्जाच्या खेळाडूची गरज होती. धवल कुलकर्णीच्या रुपात भारतीय संघाला एक चांगला गुणवंत खेळाडू मिळाला होता. पण दुर्दैवाने मुंबईच्या या जलद गोलंदाजाला बाकड्यावर बसण्याशिवाय खेळण्याची संधी नाही मिळाली. घरगुती क्रिकेटमध्ये धवल नेहमीच नंबर १ चा गोलंदाज राहिला. धवलने भारतासाठी १२ वनडेमध्ये १९ विकेट स्वताच्या नावे केले.


मनोज तिवारी
क्रिकेटमध्ये सध्याच्या सिलेक्शन प्रक्रियेचा विचार केला तर,बीसीसीआय अशाच खेळाडूंना सिलेक्ट करतात, ज्यांचं आयपीएल क्रिकेट सामन्यानंमध्ये चांगला प्रदर्शन राहिलेलं असतं. बीसीसीआय मिडियासमोर घरेलू क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेल्यांचे गुणगान गातात. पण असे अनेक घरेलू क्रिकेटर आहेत, ज्यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करूनही फक्त निराशेचे उदाहरण राहिलेत. त्यातील एक खेळाडू म्हणजे “मनोज तिवारी’ तिवारीने ५२ च्या सरासरीने ७००० रन बनवले. घरेलू (domestic) क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन असूनही, मनोज तिवारीने शेवटचा सामना वेस्टइंडिज विरुद्ध शतक बनवून पूर्ण केला.

नमन ओझा  
नमन ओझा हा धोनी व युवराज सिंग यांच्यासोबतचा विकेटकीपर फलंदाज होता. पण पण धोनीच्या खेळातील प्रसिद्धीमुळे नमन मागे राहिला. सन २०१४ मध्ये धोनीने टेस्ट मधून निवृत्त होण्याची घोषणा केली तेव्हा टीममध्ये नमन ओझाची चर्चा सुरू होती. पण दुर्दैवाने त्याची जागा रिद्धीमन साहाला दिली गेली. नमनला श्रीलंके विरुद्ध टेस्ट सामना खेळण्याची संधी मिळाली पण नमनला एकच सामना खेळायला मिळाला. पुढे नमन ओझा दुखापतीतून बरा होऊन आला तेव्हा त्याला टीममधून बाहेर काढण्यात आले. अशा गुणी खेळाडूला कधी प्रसिद्धी मिळाली नाही व हवं तसे भविष्यदेखील घडवता आले नाही. 

– सागर म्हसकर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »