महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) दुकानांच्या दर्शनीयभागी मराठी फलक ठळकपणे दिसेल, अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. असा नियम राज्यसरकारने लागू करून बरेच दिवस झाले. तरी देखील काही ठिकाणी या नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

मात्र आता ३० जूनपर्यंत पालिकेच्या नियमांची अंमलबजावणी न केल्यास कारवाईचे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी दिले आहेत. तर यावर युक्तिवाद करताना आणखी सहा महिने मुदतवाढ व्यापारी संघटनांनी मागितली, मात्र याला शर्मा यांनी विरोध केला.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सर्वच दुकानांच्या दर्शनीयभागी मराठी फलक ठळकपणे दिसेल, अशा पद्धतीने लावणे बंधनकारक केले आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने ३१ मेपर्यंतची डेडलाईन (Deadline) दिली होती. मात्र दुकानदारांनी मुदतवाढीची मागणी केल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने आणखी ३० जूनपर्यंतची मुदत वाढवून दिली होती.