भारतीय क्रिकेट (Indian Cricket) संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतची (Rishabh Pant) फसवणूक झाली आहे. आलिशान घड्याळ स्वस्तात विकत घेऊन पंतची फसवणूक झाली. पंत यांची १.६३ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. हा घोटाळा हरियाणा येथील माजी क्रिकेटपटू मृणांक सिंगने (Mrinank Singh) केला होता, ज्याने यापूर्वी एका उद्योगपतीला ६ लाख रुपयांची फसवणूक केली होती आणि तो मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,मृणांक सिंगने ऋषभ पंतलाला करोडो रुपयांची महागडी लक्झरी घड्याळे (Luxury Watch) देण्याचे आमिष दाखवले होते. पंतला फ्रँक मुलर व्हॅनगार्ड सीरीज क्रेझी कॉल वॉच (Franck muller crazy hours Call Watch) 36.25 लाख रुपयांना आणि रिचर्ड मिल वॉच त्याच्याकडून 62.60 लाख रुपयांना खरेदी करावे लागले. त्यासाठी त्याने पैसेही दिले.
या प्रकरणी पंतने मृणांक सह त्यांचे व्यवस्थापक पुनीत सोलंकी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोळंकी यांच्या म्हणण्यानुसार ही फसवणूक बाऊन्स चेकद्वारे करण्यात आली होती. पंतने दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२१ मध्ये मृणांकने त्याला स्वस्तात घड्याळ देऊन फसवणूक केली होती. मृणाकने आलिशान घड्याळे आणि दागिने विकण्याचा आणि खरेदी करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. यासाठी त्याने इतर क्रिकेटपटूंना रेफर केले होते. घड्याळांसाठी पैसे देण्याव्यतिरिक्त, पंतने लक्झरी वस्तू आणि दागिन्यांच्या विक्रीसाठी सुमारे 66 लाख रुपये दिले होते.
हरियाणाचा माजी क्रिकेटर मृणांकने याआधीही अनेकांची फसवणूक केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्याला एका उद्योगपतीची ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. याशिवाय त्याने चित्रपट निर्माते आणि अनेक हॉटेल्सची फसवणूक केली आहे.