31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी देशातील बेरोजगारी व महागाई विरोधात कॉंग्रेसचे लाक्षणिक उपोषण

देशातील बेरोजगारी व महागाई विरोधात कॉंग्रेसचे लाक्षणिक उपोषण

डोंबिवली ( शंकर जाधव ) महात्मा गांधी जयंती आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त कल्याणात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी मानव अधिकार आणि सूचना अधिकार विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणात आले.

उपोषणात प्रदेश प्रतिनिधी नवीन सिंग, उपाध्यक्ष पाॅली जेकब, जिल्हा अध्यक्ष विनोद पिल्ले, प्रतिनिधी राजू सोनी, चिटणीस सुनील चव्हाण, श्रेयस सिंह, प्रमोद हेगी, सुनील चव्हाण, आर. डी.ठाकूर, सत्यवान हिरावले, आर. बी. चतुर्वेदी, मनोज दुबे, योगेश पांडे, राजा रमेश, रत्नप्रभा म्हात्रे, सन्नी अॅथोनी,धर्मपाल तनवार, पन्नालाल शर्मा, चंदर पांडे , सीता प्रसाद, बबन राउत,पितर जेन्स, जोज राफर, अनिल बनसोडे, अशोक कापडणे,अजय पोळकर,गणेश चौधरी, जितेंद्र मुळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी प्रदेश प्रातिनिधी सिंग म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाठ्शी आहोत असे बोलणारे हे सरकार प्रत्यक्षात मात्र भाषणातच बोलतात.आपल्या देशावर २०१४ साली ५६ लाख कोटी कर्ज होते. मोदि सरकार हे आठ वर्षात १४६ लाख कोटी कर्ज आहे. १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात १ लाख १२ हजार रुपये प्रत्येक नागरिकर कर्ज आहे. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात देऊ असे म्हणणारे हे सरकार प्रत्यक्षात एक पैसाही नागरिकांच्या खात्यात पैसे टाकले नाहीत.

डोंबिवली जवळील काटइ नाक्याजवळ शेतकरी १२ दिवसांपासून धरणे आंदोलनास बसले आहेत. शनिवारी सायंकाळी केंद्रीय राज्य पंचायत मंत्री कपिल पाटील यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. आपले आंदोलन मागे घ्या अशी विनंती मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना करताना राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे शेतकऱ्यांच्या पाठ्शी आहेत, कमिटी बनविली आहे, आपल्याला नक्की न्याय मिळेल असे आश्वासन दिले. यावर कॉंग्रेस प्रतिनिधी नवीन सिंग यांना विचारले असता ते म्हणाले, हे सरकार फक्त बोलते. हे जर जनतेचे सरकार असते तर आज शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती.या शेतकऱ्यांच्या पाठीशी कॉंग्रेस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »