डोंबिवली (शंकर जाधव)
के.बी.वीरा शाळेतील विज्ञान प्रदर्शन, वाहतूक नियमांचे चित्र प्रदर्शन आणि संस्कृती प्रदर्शनात विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे शिकण्यास मिळाले. प्रदर्शनाचे उद्घाटन रामनगर डोंबिवली वाहतूक पोलीस विभागाचे उपपोलीस निरीक्षक नवनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस हवालदार रामदास भांगरे हेहि उपस्थित होते.वाहतूक नियमांचे चित्र प्रदर्शन हे सेफ्टी वेलफेअर असोसिएशन डोंबिवली या सामाजिक संस्थेच्या वतिने वाहतूक नियमांचे चित्र प्रदर्शन भरविले होते. संस्थेचे अध्यक्ष विशाल शेटे हे सातत्याने चित्र प्रदेशनाच्या माध्यमातून वाहतूकीच्या नियमांची जनजागृती करत असतात वाहतूकीची प्रदर्शनातील साहित्य शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले होते.शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता पारेख आणि त्यांच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी मुलांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना चित्र रूपाने वाहतूक नियमांची माहिती व प्रबोधन करण्यात आले. के.बी.वीरा हायस्कुलच्या मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा तसेच कल्याण डोंबिवली मनपाच्या शाळेतील सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी वाहतूक चित्र प्रदर्शन पहिले. चंद्रशेखर देशपांडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.