29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeखेळआजच्या सामन्यांमध्ये काय असणार आहे वेगळा थरार ? काय आहे गुणतालिका ?

आजच्या सामन्यांमध्ये काय असणार आहे वेगळा थरार ? काय आहे गुणतालिका ?

आयपीएल (IPL) 2022 च्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्ज (Punjab King) आणि चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai superking) संघ सोमवारी म्हणजेच आज आमनेसामने येणार आहे. पंजाब 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे, तर चेन्नई 4 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाबने 7 पैकी 3 सामने जिंकले, तर CSK ने 7 पैकी 2 जिंकले. सीएसकेला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. त्याला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील, तर त्याला आता कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करावी लागेल. गतविजेत्या सीएसकेने (CSK) अद्यापही अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजाने सजलेल्या सीएसकेला दीपक चहर आणि ॲडम मिल्नेची उणीव आहे.

गोलंदाजांनी अद्याप आपली छाप सोडलेली नाही. अष्टपैलू मोईन अली आणि शिवम दुबे यांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून 9 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाबसाठी जॉनी बेअरस्टो 4 सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान यांना सलग कामगिरी करता येत नाही. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना अपेक्षित आहे.

कर्णधार: रॉबिन उथप्पा
उपकर्णधार: रवींद्र जडेजा
यष्टिरक्षक: जॉनी बेअरस्टो
फलंदाज: रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, शिखर धवन, मयंक अग्रवाल, अंबाती रायुडू
अष्टपैलू: लियाम लिव्हिंगस्टोन, रवींद्र जडेजा
गोलंदाज: राहुल चहर, कागिसो रबाडा, ड्वेन ब्राव्हो

पंजाब किंग्स पूर्ण संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), अर्शदीप सिंग, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, शाहरुख खान, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, राज बावा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग , इशान पोरेल, संदीप शर्मा, नॅथन एलिस, अथर्व तांडे, प्रेरक मंकड, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, शिवम दुबे, दीपक चहर, सिमरजीत सिंग, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, अॅडम मिलने, राजवर्धन हंगरगेकर, प्रशांत सोळंकी, महेश टीक्षाना, मुकेश चौधरी, शुभांशू सेनापती, के.एम.आसीफ, तुषार देशपांडे, सी. हरी निशांत, एन. जगदीसन, के. भगत वर्मा.

IPL 2022 च्या 37 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून लखनौ सुपर जायंट्सने टॉप 4 मध्ये प्रवेश केला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौने पाच वेळच्या चॅम्पियन मुंबईचा 36 धावांच्या फरकाने पराभव केला. लखनौचा हा 8 सामन्यांमधला 5वा विजय आहे. यासह संघ एकूण 10 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरात टायटन्स १२ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. यानंतर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स लखनौ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी १० गुण आहेत.

धावगतीच्या आधारावर हैदराबाद दुसऱ्या, राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, आरसीबी 5 व्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज प्रत्येकी 6 गुणांसह सहाव्या, 7व्या आणि 8व्या स्थानावर आहेत.

बटलर आणि चहल यांचे वर्चस्व कायम आहे.
IPL चे 2 सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे 9व्या आणि 10व्या स्थानावर आहेत. आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईचा प्रवास जवळपास संपला आहे.
ऑरेंज कॅपबद्दल बोलायचे झाले तर ते राजस्थान रॉयल्सच्या जोस बट्टजारकडे आहे.

बटलरने 7 सामन्यात 491 धावा केल्या. ज्यामध्ये ३ शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने मुंबईविरुद्ध नाबाद शतक झळकावले. राहुलच्या 8 सामन्यात 368 धावा आहेत. पर्पल कॅपबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल या कॅपचा धारक आहे. चहलने 7 सामन्यात 18 विकेट घेतल्या. दुसऱ्या क्रमांकावर टी नटराजन आहे, ज्याने 7 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »