31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeखेळविराट कोहली सहाव्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद...आरसीबीचा हा डाव कामी येत नाही

विराट कोहली सहाव्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद…आरसीबीचा हा डाव कामी येत नाही

विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलच्या 15 व्या हंगामात सलग धावांसाठी संघर्ष करत आहे. आयपीएलच्या (IPL) ५४व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिल्याच चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्याच्या आयपीएलमध्ये विराट तिसऱ्यांदा ‘गोल्डन डक’ चा बळी ठरला आहे. सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिरकी गोलंदाज जगदीशा सुचितने कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विराटने सुचितच्या चेंडूवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जो शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने गेला आणि SRH कर्णधार केन विल्यमसनने तो पकडण्यात कोणतीही चूक केली नाही.



एकूणच आयपीएलमध्ये विराट कोहली सहाव्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. 2008 मध्ये पहिल्यांदा आशिष नेहराने (Ashish Nehra) त्याला गोल्डन डकचा बळी बनवले. तेव्हा नेहरा मुंबई इंडियन्स कडून खेळत होता. 2014 मध्ये पंजाब किंग्ज चा गोलंदाज संदीप शर्माने तर 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईलने त्याला पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. या मोसमात लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने विराटला डीवाय पाटील, मुंबई येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात गोल्डन डकचा बळी बनवले. यानंतर सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज मार्को येनेसनने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले.

डेव्हिड वॉर्नर ने केला अनोखा विक्रम आपल्या नावावर, धोनी, रोहितच्या जाणार पुढे 


विराट कोहलीने 12 सामन्यात 216 धावा केल्या आहेत

33 वर्षीय विराट कोहलीने या मोसमात खेळल्या गेलेल्या 12 सामन्यांमध्ये 216 धावा केल्या असून, 58 धावा हा त्याचा सर्वोत्तम धावसंख्या आहे. या दरम्यान कोहलीची सरासरी 19.64 तर स्ट्राइक रेट 111.34 आहे. चालू मोसमात कोहलीच्या बॅटमधून एकूण 20 चौकार आणि 4 षटकार आले आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये कोहली ओपनिंगसाठी क्रीझवर येत आहे, पण आरसीबीचा हा डावही कामी येत नाहीये.

आरसीबीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. हैदराबाद संघाने दोन बदल करताना जगदीश सुचित आणि फजलहक फारुकी यांना संधी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »