29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील-एकनाथ शिंदे

डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील-एकनाथ शिंदे

कल्याण-डोंबिवलीमध्ये (Kalyan- Dombivali) सध्या निवडणुकी पूर्वीचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहेत. नवीन शाखा, नवीन उद्यान आणि बरंच काही कार्यक्रम येत्या काही महिन्यांमध्ये नागरिकांना पाहायला मिळणार आहेत.  महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुक पॅनल पद्धतीने होणार आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे. 

डोंबिवलीत एका कार्यक्रमात ऑनलाईन प्रणालीद्वारे संवाद साधत असताना त्यांनी डोंबिवलीतील शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे यांच्या प्रयत्नाने डोंबिवली पश्चिमेकडील आनंदनगर उद्यान लोकापर्ण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, प्रकाश म्हात्रे, कविता गावंड, किरण मोंडकर, सागर जेधे, संतोष चव्हाण, आदि मान्यवर उपस्थित होते.खासदार डॉ. शिंदे यांनी लहान मुलांबरोबर उद्यानामधील रबर मॅट प्ले ग्राउंडचे फीत कापून उदघाटन केले. तर हिडन फौंटन सुरु केल्याने उपस्थित डोंबिवलीकरांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. तर खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याण- डोंबिवली शहराच्या विकासासाठी आजवर केलेल्या कामाची माहिती थोडक्यात उपस्थितांना सांगितली. पुढे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवलीतील मोठा गाव येथील खाडी किनारी लवकरच नेचर पार्क बनविणार तसेच डोंबिवली पुर्वेप्रमाणे पश्चिमेला देखील गॅस लाईन लवकरच सुरु होणार असल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »