डोंबिवली ( शंकर जाधव ) गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात स्व.शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने शिवसैनिक जमा होत होते. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्वव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठीहि गर्दी होते. येत्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचाराचे सोने लुटण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतून सुमारे ५ हजार शिवसैनिक निघणार आहेत. विशेष म्हणजे खाजगी वाहनांनी ना जाता सर्व शिवसैनिक रेल्वेतून तिकीट काढून जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी सांगितले.डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकर म्हणाले, डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत सर्व शिवसैनिक जमा होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी जाणार आहोत.