डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील या रस्त्यावर एकही खड्डा पडू देणार नाही इतके उत्कृष्ट दर्जाचे काम करू असे आश्वासन मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी नागरिकांना दिले.डोंबिवली पूर्वेला स्टार कॉलनी येथील २०० मीटर एका रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे.या रस्त्याच्या कामाच्या उदघाटनप्रसंगी मनसेकडून देण्यात आलेल्या आश्वासनचे नागरिकांनी कौतुक केले.
मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या आमदार निधी ५० लाख यातून डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलनी प्रभाग क्र.,११२ मधील स्वामी नारायण मंदिर ते रॉयल स्कुल पर्यत रस्ता व जनता मेडिकल ते स्वामी नारायण मंदिर पर्यत सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता बनविण्याच्या कामाचा उदघाटन सोहळा मनसे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, डोंबिवली विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष मिलिंद म्हात्रे,सुदेश चुडनाईक, संजय चव्हाण, ओम लोके, अनिल वलेकर, योगेश पाटील, काशिनाथ पाटील, संजय सळमाळकर यांसह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी नागरिकांनी पाटील यांना नालेसफाईबाबत सांगितले असता पाटील यांनी नालेसफाईची पाहणी केली.यावेळी पाटील म्हणाले, पालिका प्रशासनाला पत्र देऊन १०० टक्के नालेसफाई होईल यावर विश्वास नाही.मी स्व खर्चाने येथील नालेसफाई करून देतो.मात्र येथील स्थानिक नागरिकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.पुढे मनसे शहर अध्यक्ष घरत यांनी स्थानिक नागरिकांसमोर ठेकेदाराला सांगितले की काम उत्तम झाले पाहिजे, तसेच स्थानिकांनी काम सुरू असताना कामाकडे लक्ष ठेवावे.कामाच्या दर्जात कमी आल्यास थेट मला संपर्क साधा.मात्र तशी वेळ येणार नाही असे ग्वाही घरत यांनी दिल