
डोंबिवली ( शंकर जाधव )
कल्याण जवळील मंगरूळ गावची पैलवान वैष्णवी दिलीप पाटील ही आज सांगलीत सायंकाळी होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला या स्पर्धेमधील अंतिम फेरीत सांगलीतील प्रतीक्षा बागडीबरोबर लढत होणार आहे. कल्याणची वैष्णवी पाटील जय बजरंग तालीम येते पंढरीनाथ ढोणे वसंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी तसेच लहानपणापासूनच कुस्तीची आवड आणि आतापर्यंत सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी वैष्णवी पाटील महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये ती पोचली असून तिच्या कामगिरीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिला आहे

वैष्णवी पाटील हिला वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांचेही घरामधून पहिल्यापासूनच कुस्ती – पैलवानकी ओढा होता आणि मुलीला राज्य राष्ट्रीय लेव्हल पर्यंत तसंच आंतरराष्ट्रीय लेव्हल पर्यंत त्यांनी बाळगलेला स्वप्न मला पूर्ण करायचा असून महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धेपर्यंतच मला न थांबता मला आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक पर्यंत मजल मारायचे आहे असे वैष्णवीने सांगितले.