डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण शीळ रोड रुंदीकरणात बाधित झालेल्या ग्रामस्थांना अद्याप मोबदला न मिळाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. मंगळवारीपासून बाधित ग्रामस्थांनी कल्याण शीळ रोडवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या नियमानुसार मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह रास्ता रोको करत उग्र आंदोलन करू असा इशारा या वेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.