बॉलीवूडची (Bollywood) क्वीन (Queen) म्हणून ओळखली जाणारी कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या चित्रपटातील व्यक्तिरेखांसोबतच तिचा अभिनय आणि लुक (Look) यावर प्रचंड मेहनत घेते. कंगनाच्या ‘इमर्जन्सी‘ (Emergency) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती, ज्यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक First Look of Emergency समोर आला आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) एक व्हिडिओ (Video) पोस्ट (Post) करत चित्रपटातील तिचा पहिला लूक शेयर (Share) केला आहे, ज्याला तिने, सादर करतेय ज्याना सर म्हटलं जायचं असं कॅप्शन (Caption) दिले आहे.
आजवर कंगना रणौत हिला चार वेळा राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त झाला आहे आणि हा सन्मान प्राप्त होणारी हिंदी सिनेसृष्टीतील ती एकमेव अभिनेत्री आहे. मणिकर्णिका या चित्रपटातून झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि थलायवी चित्रपटातून तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांची भूमिका साकारणारी कंगना आता स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. ‘इमर्जंसी’ या आगामी हिंदी चित्रपटासाठी कंगनानं इंदिरा गांधींचा वेष धारण केला आहे.
‘मणिकर्णिका’ या चित्रपटानंतर ‘इमर्जंसी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील कंगना रणौत हिने केले आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे, ज्यात इंदिरा गांधींच्या गेटअपमध्ये कंगना दिसते आणि या गेटअप मध्ये तिला ओळखता येणे कठीण आहे.
दिग्दर्शनासोबत कंगनाने रेनू पिट्टी यांच्या साथीनं या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. या चित्रपटाचे पटकथा व संवादलेखक रितेश शाह हे आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, भारतातील इमर्जंसीचा काळ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.