29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी KDMC : डोंबिवली आणि कल्याण पूर्वच्या काही भागात दोन दिवस 'वीज' सुट्टीवर

KDMC : डोंबिवली आणि कल्याण पूर्वच्या काही भागात दोन दिवस ‘वीज’ सुट्टीवर

वीज वितरण व्यवस्थेच्या नियोजित देखभालीसाठी डोंबिवली आणि कल्याण पूर्वेतील काही भागांमध्ये बुधवारी सकाळपासून गुरुवारी दुपारपर्यंत काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी सहकार्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

डोंबिवलीतील रामनगर फिडरवरील रामनगर पोलीस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांतीनगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रोड, आयरे गावचा वीजपुरवठा बुधवारी (२० एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत खंडित राहणार आहे.
कॉमर्स, फीडर, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जुना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगीतवाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड, आणि तुकाराम नगर फीडरवरील स्वामी स्कूल, आयरे रोड, तुकाराम नगर, सुदामवाडी, आयरे नगर. पाटकर शाळा परिसरात गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

बुधवारी (20 एप्रिल) आजदे, पाथर्ली, सागर्ली, एमआयडीसी कॉलनी, अजदेपारा, जिमखाना रोड, शेलार नाका, इंदिरा नगर झोपडपट्टी, रेल्वे कॉलनी, त्रिमूर्ती नगर झोपडपट्टी भाग आणि 22 केव्ही टेम्पो नाका फीडर आणि 22 केव्ही एमआयडीसी फीडर क्रमांक 11 वर एमआयडीसी फेज २ मधील काही भागांमध्ये गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

देखभाल दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित परिसरात लवकरच वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. महावितरणच्या स्वयंचलित यंत्रणेने परिसरातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे वीज कपातीबाबत सतर्क केले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »