नवी मुंबई,पुणे या पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली (Kalyan-Dombivali) महापालिकेमधील ५५ पेक्षा जास्त नगरसेवकांनी बंड केला आहे. ते नगरसेवक आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यामुळे आता फक्त आमदारच नाही तर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना रोखण्याचे आवाहन ठाकरेंसमोर आहे. पक्षातील बंडखोरी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे रोज नवनवीन उपक्रम राबवून नगरसेवक,पदाधिकारी व आमदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेची गळती सुरूच आहे.
ठाणे व नवी मुंबई नंतर आता कल्याण डोंबिवली च्या नगरसेवकांनी आपला पाठिंबा शिंदे गटालाच देणार असे ठरवले आहे तसेच दुसरीकडे शहर प्रमुख राजेश मोरे सुद्धा आता शिंदे गटात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आमदार,खासदार,नगरसेवक आणि पदाधिकारी सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहे.
राज्यातील महापालिका निवडणूका काही महिन्यांवर येऊन पोहोचल्या आहेत त्यातच बरेचसे आमदार नगरसेवक पदाधिकारी उद्धव ठाकरेंना राम राम करून शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे पारडे जड होतानाचे चित्र दिसत आहे. असे असताना पुण्यातील नगरसेवक व पदाधिकारी एकनाथ शिंदेच्या गटात जाण्याचा निर्णय शनिवारी घोषित करणार आहेत. या बाबत आपली भूमिका ते पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत.