केदारनाथमध्ये (Kedarnath) सकाळी एका खासगी हेलिकॉप्टरला (Helicopter) अपघात झाला. हे हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हेलिकॉप्टर अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण आठ जण होते असे सांगण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर उत्तराखंडच्या केदारनाथपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कोसळले.
हेलिकॉप्टरमध्ये 8 भाविक होते. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी बचाव पथकही रवाना करण्यात आले. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर आग लागली. हेलिकॉप्टरचा अक्षरश: चुराडा झाल्याचे धक्कादायक फोटोही समोर आले आहेत.
या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा संशय आहे. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी आता तज्ज्ञ करणार आहेत. केदारनाथपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरुरछट्टी गावात हेलिकॉप्टर कोसळले. यानंतर खळबळ उडाली. हेलिकॉप्टरच्या अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने लोक हादरले. त्यामुळे आजूबाजूचे लोकही घाबरले होते. हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळले.