29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी 'या' जवळच्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देत केतकी माटेगावकरने शेअर केली भावुक पोस्ट

‘या’ जवळच्या व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देत केतकी माटेगावकरने शेअर केली भावुक पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या (Ketaki Mategaonkar) चुलत भावाचे दोन आठवड्यापूर्वी निधन झाले. पुणे येथील सुसगावमध्ये राहत असलेल्या २१ वर्षाच्या अक्षय माटेगावकरने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे केतकी माटेगावकर व तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली. त्यांना दुःखद धक्का बसला आहे. केतकीचे आपल्या भावावर प्रचंड प्रेम होते. दोन आठवड्यानंतर केतकीने आपल्या भावासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. तसेच अक्षयबरोबरचे काही फोटो देखील तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.


केतकीने तिच्या पोस्टच्या माध्यमातून भाऊ अक्षयबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच तो आपल्यासाठी खूप प्रिय होता हे देखील केतकीने सांगितले आहे. केतकीने लिहिलंय, माझा अक्षु, माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्यासारखा अत्यंत सुस्वभावी, समंजस, हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मला मिळाला. आता काय लिहू, लिहू की नको. २१ वर्षाच्या आठवणी शब्दात कशा लिहू विचार करतेय. गेल्या काही दिवसांपासून माझ्या दिवसाची सुरुवातच तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणांपासून होत आहे. मला हे क्षण माझ्यापासून कधीच लांब करायचे नाही. किती आणि केवढ्या आठवणी आहेत.

“अभ्यास झाला की सगळं बाजूला ठेवून रियाझामध्ये हरवून जाणारा अक्षु. गजल, ठुमरी तर कधी हरिहरन, पिंक फ्लॉइड ऐकणारा अक्षु. भारतीय शास्त्रीय संगीत तर कधी फुटबॉलमधलं ज्ञान आत्मसात करणारा अक्षु, असा अक्षु मला सोडून गेला. असे पुढे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. केतकीने अशा अनेक आठवणी तिच्या पोस्टच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.

आयुष्यभर आपला भाऊ आपल्याबरोबर असल्याची जाणीव राहिल असे केतकीने यावेळी म्हटलं आहे. आजही केतकी सकाळी उठली की भाऊ अक्षय आपल्याबरोबर आहे असं तिला वाटतं. पण लगेच सत्य परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहते. केतकीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच तिची ही भावुक पोस्ट पाहून अनेकांनी केतकीच्या भावाला श्रद्धांजली दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »