32 C
Mumbai
Sunday, May 21, 2023
HomeKalyan-Dombivliपरराज्यातून कोकण रेल्वेगाडी आरक्षण तिकीट बुक

परराज्यातून कोकण रेल्वेगाडी आरक्षण तिकीट बुक

मनसे आमदार संतापले…..रेल्वे मंत्रालयाकडून कानाडोळा

डोंबिवली ( शंकर जाधव ) :- कोकणात जाणाऱ्या रेल्वे आरक्षण १७ सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले होते. मात्र पहिल्याच दिवशी व तीन मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे.दलालांच्या हातात आज सर्व आरक्षण असून परराज्यातून तिकीट बुक होतात. असे असतांही मंत्रालयाला कोणतंही गांभीर्याने नाही आणि याची कधी चौकशी देखील होत दलालांच्या हातात सर्व आरक्षण असून परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात. ही सत्य परिस्थिती सर्वश्रुत असताना रेल्वे मंत्रालयाकडून याची साधी दखलही घेतली जात नाही. सर्व रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन करून गौरी गणपती निमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळावे जेणेकरून कोकणवासियांचा प्रवास सुखकर करा अशी मागणी मनसे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांनी केली आहे.

      गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल झाले आहेत. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक उरलेले नाही. गणपतीच्या दिवसांसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. १७ सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले होते. मात्र पहिल्याच दिवशी व तीन मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या नजरा आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांकडे लागल्या आहेत. मात्र अद्याप रेल्वे कडून कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पत्राद्वारे कळविले आहे. या पत्रामध्ये आमदार पाटील यांनी कोकणवासियांच्या व्यथा मांडल्या आहेत.
  रेल्वे मंत्रालय यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रात म्हणाले आहेत कि, दलालांच्या हातात आज सर्व आरक्षण असून परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात. असे असतांही मंत्रालयाला कोणतंही गांभीर्याने नाही आणि याची कधी चौकशी देखील होत नसल्याने दलालांना संधी मिळत आहे. सर्व रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन आताच करून गौरी गणपती निमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळवून कोकणवासियांचा प्रवास सुखकर करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »