डोंबिवली ( शंकर जाधव ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय ,पुणे क्रीडा संचालनालय व श्री समर्थ व्यायाममंडळ, इंदापूर,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील शिवकछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मध्ये डोंबिवलीतील क्षितीज संचालित गतिमंद मुलांची शाळेने बाजी मारली. या शाळेतील सेजल सुरजमल जैस्वाल या विद्यार्थीने २०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. काही दिवसात जर्मनी येथे होणाऱ्या स्पेशल ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेत सेजल जेसवालची निवड झाली आहे. स्पर्धेत भारतातील संघातून सेंजल खेळणार आहे.सेजल हि दिवा शहरात राहत असून तिचे वडील रिक्षाचालक आहेत.