डोंबिवली (शंकर जाधव)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात जीवनगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शामराव यादव यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यादव यांनी अनेक सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलला असून त्यांच्या कार्याची दाखल घेऊन मंत्री चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले. नुकतेच यादव यांनी लोढा निळजे येथील एका अंध विद्यार्थ्यांला मदतीचा हात दिल्याने त्याचे सर्वांकडून कौतूक करण्यात आले होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, समाधान तायडे, दिनेश साळवे, जी डी कदम, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक राहुल दामले आदी मान्यवर उपस्थित होते.