कोरोनाच्या (Corona) महामारीनंतर अनेकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यात विजेचे बिल (Bill) देखील वाढत चालले आहे. या मुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत. याच गोष्टीचा फायदा घेत एका व्यक्तीने वीज बिलाची किंमत कमी करून देण्याचे आमिष दाखवत अनेकांना लुबाडले तर हे नक्की काय प्रकरण आहे…
कल्याण मध्ये एका भामट्याने विजेचे बिल कमी करून देईल अशी खोटी अशा दाखवून महावितरणच्या २३ ग्राहकांकडून पैशे घेतले. या व्यक्तीने महावितरणचे तब्बल २लाख ४०हजार ७०० रुपयाची फसवणूक केली. यावर कल्याण प्रथमवर्ग न्यायालयाने १ वर्षाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आरोपीचे नाव साहिल असगर पटेल असे आहे. हा व्यक्ती कल्याण पाश्चिम मधील बिस्मिल्ला हॉटेलजवळ, मौलबी चौक, गोविंदवाडी येथील रहिवासी आहे.
प्रकरण लक्षात येताच महात्मा फुले चौक पोलिसांनी मार्च २०२१ मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला भादविच्या कलम ४२० नुसार एक वर्ष कारावास व एक हजार रुपयांचा दंड आणि कलम ४०६ नुसार सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.