31 C
Mumbai
Tuesday, May 2, 2023
Homeताजी बातमी लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली, २ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा

लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली, २ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा

डोंबिवली (शंकर जाधव)

तालुकास्तरावर आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी १९३० प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी २ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा केला.

कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलल्या तसेच वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार १९३० प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व २ कोटी १५ रुपयांची वसूली झाली. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात ४४० ग्राहकांनी ४८ लाख ९७ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर भागातील ८२ लाख ६४ हजार रुपयांचा भरणा करणाऱ्या ९४६ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली.

वसई मंडलांतर्गत वसई, विरार, वाडा, सफाळे येथील १६६ ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत ५६ लाख ५ हजार रुपयांचा भरणा केला. तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील ३७८ ग्राहकांनी २७ लाख ४६ हजार रुपये भरून आपली प्रकरणे निकाली काढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »