31 C
Mumbai
Monday, May 1, 2023
HomeKalyan-Dombivli२०२२-२३ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या वीज मंडळातील कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह...

२०२२-२३ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या वीज मंडळातील कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान

डोंबिवली (शंकर जाधव)

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कल्याण परिमंडलातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना पुरस्काराने गौरवण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सन २०२२-२३ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुख्य अभियंता औंढेकर यांनी तांत्रिक कर्मचारी हे महावितरणच्या प्रगतीचे शिल्पकार असल्याचे नमूद करत अधिक जोमाने काम करून नवनवीन यशोशिखरे पादाक्रांत करण्याबाबत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राच्या निर्मितीसोबतच राज्य वीज मंडळाची स्थापना झाली. अनेक स्थित्यंतरे अनुभवताना राज्याच्या प्रगतीचे चक्र अबाधित ठेवण्यात तत्कालिन राज्य वीज मंडळ व आत्ताचे महावितरण यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. किंबहूना राज्याच्या प्रगतीत वीज कर्मचाऱ्यांच्या प्रचंड व अथक परिश्रमाचे मोलाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) यांनी काढले.
यावेळी सहायक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता अनिल महाजन, नरेंद्र धवड, युवराज जरग, सुभाष बनसोड, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, निलेश गायकवाड, पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अहिर यांनी आभार मानले.

पुरस्कार प्राप्त कर्मचारी

कल्याण मंडल एक – श्रीशैल घोडके, हेमंत पाटील, प्रमोद लगशेट्टी, जयवंत हमरे, सरदार चव्हाण, भरत गांगुर्डे, प्रविण हरड, सुधीर आळशी, मधुकर घोरपडे, लक्ष्मण भोईर, विनोद गिलबिले, कविता शेळके, कचरु खंडागळे

कल्याण मंडल दोन – सुरेश कालात, जयेश चौधरी, अनिल गिर्डे, सुरेश निगुर्डे, धनाजी दाते, समाधान गायकवाड, ज्ञानेश्वर निकुंभ, सुरेश बागुल, सुर्यकांत मढवी, दिनेश ढमके, महेश रसाळ, राम ढेपे, जयवंत उघडा, रमेश राठोड, संजय सोनवणे, मुकुंद गायकवाड

वसई मंडल – प्रकाश जाधव, परेश वाडे, पुंडलिक वाघ, जुगराज सपाट, सचिन जाधव, दत्तात्रेय चिमडा, रविंद्र साबळे, कृष्णा खोडका, शिवाजी सुरनार, परशुराम भोये, प्रमोद जाधव

पालघर मंडल – जयंत लाड, समशेर शेख, भरत किणी, नथुराम गुहे, रविंद्र सपकाळे, वसंत बोरसे, लक्ष्मण बाबर, पांडुरंग डावरे, विजय कुरेकर, रमेश गवळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »