31 C
Mumbai
Monday, May 1, 2023
Homeताजी बातमी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुलचा वर्षांत समारंभ

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुलचा वर्षांत समारंभ

डोंबिवली (शंकर जाधव)

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, लोकमान्य गुरुकुलाचा वर्षांत समारंभ  सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रा. प्रसाद भिडे उपस्थित होते.तर टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत, कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वललाने झाली. डॉ. भिडे यांनी आपल्या मनोगतामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने चालणाऱ्या गुरुकुल शाळेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची सहकार्य वृत्ती त्यांनी अधोरेखित केली. योगासानातील विद्यार्थ्यांचे लवचिक अंग बघून योगासनांची तयारी फक्त कार्यक्रमासाठी नाही हे यातून सिद्ध होते असे त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले. भारतातील गुरुकुल पद्धती जपून विद्यार्थ्यांना सर्वांगाने  मन, बुद्धी आणि शरीर याचा समतोल राखणारी गुरुकुल शाळा म्हणून शाळेचा गौरव केला. ६० च्या दशकापासूनच्या गाण्यांची माहिती ते भारताचे मिशन मंगल, सध्याचे G-२० साठी भारताला मिळालेले अध्यक्ष स्थान हे विद्यार्थ्यांना माहीत आहे. पंयाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण आपला आहार कसा राखला पाहिजे ? याचे मार्गदर्शन केले. सुट्टीत भरपूर खेळा, या ऋतूत येणारी फळे खा; असे त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना आवाहन केले. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. प्रा. प्रसाद भिडे सरांचा शाल, श्रीफळ व विद्यार्थ्यांनी तयार केलेली कागदी फुलांची परडी देऊन सत्कार करण्यात आला.

अत्यंत सुंदर अश्या ‘ हे प्रभो विभो ‘ या नांदिने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘आईगिरी नंदिनी’ अशी देवीची आळवणी करून देवीला नमन करण्यात आले. ‘शिवबा आमचा मल्हारी’ या गाण्यावर लहान मुलांनी नृत्य सादर करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘ छत्रपती शिवाजी महाराजाना’ मानाचा मुजरा केला. अत्यंत सुंदर अशा पद्धतीने लहान व मोठ्या सर्व विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. यानंतर साधारणपणे ६०-७० च्या दशकातील काही हिंदी गाणी विद्यार्थ्यांनी ‘मेडली’ सादर केली. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पहिला मराठी चित्रपट ‘श्यामची आई’ मधील ‘छडी लागे छम छम’ या गाण्यावर लहान विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.’मिशन मंगल’ गाण्यावर नृत्य तर ‘किलबिल किलबिल’ पक्षी बोलती हे गीत विद्यार्थ्यांनी गायले.‌ शिवाय ‘वेध एक्टिंग अकॅडमीने’ बसवलेले नाटक ‘गोष्ट एका ज्ञानमंदिराची’ सादर करण्यात आले. या नंतर प्रेक्षकांची मने वेधून घेतील अशी मल्लखांबाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यानी केली. वर्षभरात अत्यंत सुंदर कामगिरी करणाऱ्या काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  प्रमुख अतिथी डॉ. प्रा. प्रसाद भिडे आणि संस्था पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गाण्यावर गुरुकुलातील सर्व विद्यार्थी शिक्षक, छंद वर्ग, योगा व क्रीडेचे प्रशिक्षक, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व संस्था पदाधिकारी रंगमंचावर येऊन प्रेक्षकांना वंदन करून संपूर्ण वंदे मातरमने वर्षांत समारंभाची सांगता करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी वर्षभर काढलेल्या सुंदर चित्रांचे तसेच कौशल्य विकसन शिबिरात तयार केलेल्या वस्तूंचे, रांगोळ्यांचे प्रदर्शन सावित्रीबाई फुले कलादालनात भरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी केले. ‘उज्ज्वल भारत’चे सूत्रसंचालन  पार्थ डोळस कु. सान्वी नेरकर व  हेमांगी भुसेवार या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमात  सुलोचना गोरे-चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.सावित्रीबाई फुले कलादालनात सुलोचना गोरे-चौधरी, अश्विनी जाधव, स्नेहा मुंढे यांनी रांगोळी काढली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका अर्चना पावडे आणि उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई व पर्यवेक्षक शांताराम बोरसे यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »