Bhiwandi (मिलिंद जाधव): शैक्षणिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ३ मार्च २०२३ रोजी ”लोकधारा प्रतिष्ठान” ट्रस्ट व गुंज संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पिसे केंद्रातील जि. प. मराठी फुलोरेपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व खेळाच्या साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
लोकधारा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद जाधव, परिस प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष कमलेश जाधव, जिजाऊ समाजिक,शैक्षणिक संस्थेचे आतकोली शाखाप्रमुख पंकज भोईर यांनी शिक्षणाविषयी विद्यार्थांमध्ये जनजागृती केली. कवी मिलिंद जाधव यांनी ‘आई मला शाळेला जायचं हाय’ ही कविता सादर केली.
तसेच लोकधारा प्रतिष्ठान” ट्रस्ट व गुंज संस्थेच्या वतीने जि. प. फुलोरेपाडा मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वही,पेन,पेन्सिल, कलर खडू,गोष्टीची पुस्तके, खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी एबीसीडी बोर्ड, अंक गोळा करणे, एबिसिडी शोधणे, वस्तू बनविणे,लपलेले ऑब्जेक्ट कोडे, रंगीत वस्तू बनविणे असे विविध उपक्रम लोकधारा प्रतिष्ठान” ट्रस्ट व गुंज संस्थेच्या वतीने घेण्यात आले.
यावेळी लोकधारा प्रतिष्ठान” ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद जाधव,
परिस प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष कमलेश जाधव, जिजाऊ समाजिक,शैक्षणिक संस्थेचे आतकोली शाखाप्रमुख पंकज भोईर आणि मुख्याध्यापक पोपट काळे व विद्यार्थी उपस्थित होते.