राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वारंवार दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थकवा जाणवू लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने शिंदे यांनी त्यांचे सर्व प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे पुढील काही दिवस कोणताही कार्यक्रम करणार नसल्याचे बोलले जात आहे. या काळात ते सर्वसामान्य नागरिकांना भेटणार नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र, ते मंत्रालय किंवा त्यांच्या निवासस्थानातून काम करणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांना थकवा जाणवत असला तरी काळजी करण्यासारखे काही नाही, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, डॉक्टरांनी शिंदे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी गेले काही दिवस त्यांची धावपळ सुरु होती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यासाठी त्यांना फिरावे लागले. यासोबतच मंत्रालयात बैठका घेऊन अनेक प्रश्न सोडवावे लागले. त्यानंतर त्यांना रात्री उशिरा दिल्लीला जावे लागले. पुरेशी झोप घेता आली नाही. त्यातच त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले. यावेळी ते त्या-त्या जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेताना राजकीय सभांनाही जात होते. त्यामुळे त्यांची दमछाक झाली असावी, असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, येत्या ५ ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, डॉक्टरांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिंदे यांनीही प्रकृतीच्या कारणास्तव सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
Sanjay Raut : संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार ? कोठडीत केली वाढ
त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. फडणवीस आपले सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला गेले आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे तर्कवितर्क काढले जात आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.