विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत (Shivsena) अनेक महत्वपूर्ण घटना घडत आहेत. अशातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) आपल्या काही समर्थकांसमवेत नॉट रिचेबल (Not reachable) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटने नंतर शिवसेनेत चांगलीच खळबळ उडाली आहे यावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि ट्विट (Tweet) करत मोठा दावा केला आहे.

आतापर्यंत शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्या मध्ये अनेक चकमकी घडत होत्या त्यामुळे या घटनेवर आज सकाळी ट्विट करत किरीट सोमय्या व्यक्त झाले.
शिवसेनेला ( माफिया सेनेला) 52 मत मिळाली.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 21, 2022
१२ मत फुटली ( 55 शिवसेना + 9 समर्थक = 64)
उद्धव ठाकरे सरकारचे बारा वाजणार हे निश्चित @BJP4India @Dev_Fadnavis
एकनाथ शिंदे ३५ आमदारांसह सूरतमध्ये
नॉट रिचेबल एकनाथ शिंदे गुजरातमधल्या हॉटेल मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. या सोबतच ते १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. शिंदे यांनी रात्री उशिरा भाजपच्या एका नेत्यासोबत बैठक घेतली असल्याचे अंदाज आहेत.
शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे म्हटले जात होते.