31 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी डोंबिवलीमध्ये १२ तारखेला रंगणार दोन हवेहवेसे नाट्यप्रयोग

डोंबिवलीमध्ये १२ तारखेला रंगणार दोन हवेहवेसे नाट्यप्रयोग

कोरोनामध्ये नाट्यगृहापासून लांब राहिलेला रसिक वर्ग सध्या स्वतःचे चांगले मनोरंजन करून घेण्यासाठी उतावीळ झाला आहे. चित्रपट कितीही चांगले आले तरी नाटक पाहणारा प्रेक्षकवर्ग हा अतिशय वेगळा आहे. अशामध्येच डोंबिवली सारख्या सांस्कृतिक राजधानी मध्ये जरा जास्तच प्रमाण पाहायला मिळते. अशाच चोखंदळ प्रेक्षकांसाठी येत्या शनिवारी म्हणजेच १२ मार्च रोजी दोन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असे नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत. सावित्रीबाई कलामंदिर नाट्यगृह, डोंबिवली येथे हे दोन प्रयोग पार पडणार आहेत

तो, पाऊस आणि टाफेटा  
भविष्याची स्वप्ने रंगवत एक तरुणी घर बाहेर पडते काही तरी मिळवण्याच्या उद्देशाने, या प्रवासात  तिला एक अनोळखी व्यक्ती भेटतो, या दोन अनोळखी व्यक्तीन मधला संवाद, प्रसंग यातून हि कथा पुढे सरकते..  
खर तर हि कथा वास्तव आहे की कल्पना?  हा प्रश्न सोडवत कथा पुढे घडत जाते.. त्यातही तिसरीच व्यक्ती हि कथा मांडत आहे जो त्याच्या रोजच्या वर्तमान काळात व्यस्त आहे.. ज्याचा परिणाम त्याच्या लिखाणावर होत असतो.. आणि घडणार कथानक बदलत असतं..
परंतु या काल्पनिक कथेत आणि हि कथा घडवणाऱ्या माणसाच्या आयुष्यात एक गोष्ट साम्य आहे आणि ते म्हणजे पाऊस. नितीन सावळे, तुषार गोडसे लिखित आणि नितीन सावळे दिग्दर्शित हे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच भावना असल्याचे दिसून येते. 

नवरा आला वेशीपाशी 
आपलं दुःख कुणालाच कळणार नाही, कुणी ते समजूनच घेऊच शकत नाही, असं प्रत्येकाला आपल्या कुठल्यातरी दुःखाबद्दल वाटत असतंच ना…? तेव्हा ते दुःख ऐकून, समजून घेऊन त्यावर फुंकर घालणारं कुणीतरी भेटायची आपल्याला गरज असते आणि त्यात ज्याला आपण दुःख म्हणतोय ते मुळात दुःखच नाही असं काहीतरी सांगणारं समजावणारं कुणीतरी आपल्याला भेटलं तर सोन्याहून पिवळं. एकमेकांशी लग्न ठरलेल्या अशाच दोन अनोळखींची गोष्ट म्हणजे, ‘नवरा आला वेशीपाशी’. कुणाचं दुःख, काय दुःख आणि कोण त्यावर कशी फुंकर घालणार? हसत-खेळत आणि थोडं मनाला चटका लावत हीच गोष्ट अनुभवण्यासाठी, पद्मविजय प्रोडकशन आणि राधा क्रिएशन्स निर्मित अनुभूती सादर करीत असलेला हा दीर्घांक म्हणजे ‘नवरा आला वेशीपाशी’

दरम्यान तिकीट विक्री सुरु झाली असून आजच आपली सीट बुक करा असे आवाहन संपूर्ण टीमकडून करण्यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »