29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी दोन बहिणींचा एकाच मुलाशी एकाच मंडपात विवाह ; मात्र आता त्याच मुलाची...

दोन बहिणींचा एकाच मुलाशी एकाच मंडपात विवाह ; मात्र आता त्याच मुलाची पहिली बायको हजर… पुढे काय ?

देशात विदेशात नेहमीच  काहींना काही विचित्र आणि मनाला न पटणाऱ्या गोष्टी घडत असतात. मात्र जेव्हा अशा काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात तेव्हा खूप जास्त कुतूहल वाटतं. गेल्या दोन दिवसामध्ये बातम्यांमध्ये तुम्ही दोन जुळ्या बहिणींच्या लग्नाची गोष्ट वाचली, ऐकली असेलच… संपूर्ण राज्यातून देशातून या प्रकरणावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण :
सोलापूरमधील अकलूज येथील दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी, एकाच दिवशी, एकाच मंडपात लग्न केले. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या प्रकारानंतर माध्यमांनी या प्रकरणाला जोर लावून धरले. सदर मुलगा अतुल हा मुंबईमध्ये राहणारा असून त्याचा ट्रॅव्हल्सच्या व्यवसाय आहे. तर पिंकी आणि रिंकी या जुळ्या मुली कांदिवलीमधील राहणाऱ्या असून उच्चशिक्षित आहेत.

नेमकं यांचं जुळलं कसं ?
काही महिन्यापूर्वी रिंकी आणि पिंकी यांची आई आजारी पडली, यादरम्यान अतुलच्या टॅक्सीने प्रवास करता करता अतुल रुग्णालयात त्यांचा आईची काळजीदेखील घेऊ लागला. या सर्व दरम्यान प्रेम जुळले आणि प्रकरण विवाहापर्यंत पोहचले.  
तिघेदेखील त्यांच्या मनाप्रमाणे घडल्यामुळे खुश होते. मात्र त्यांचा हा आनंद किती वेळ टिकणार आहे हे मात्र सांगता येणार नाही. कारण महिला आयोगाने त्यांच्या या प्रकारच्या विवाहावर आक्षेप घेतला आहे. तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे आता या नवरदेवावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही, आता यामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आला आहे 
मुंबईतील जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुल आवताडे याच्या लग्नाची दुसरी गोष्ट उजेडात आली आहे, म्हणजेच अतुलचे यापूर्वीदेखील लग्न झाले असून, त्याच्या अगोदरच्या पत्नीची या प्रकरणात एंट्री झाली आहे. आपण त्याची पत्नी असल्याचा दावा करत सदर महिलेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. अतुलच्या पहिल्या पत्नीची एंट्री झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच गंभीर वळण मिळाले आहे. आधीच कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलेला हा विवाह, महिलेने आपण अतुलची पत्नी असल्याचा दावा करत तक्रार केल्यामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. सदर प्रकरण सिद्ध झाल्यास मुलीकडच्या मंडळींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बहुचर्चित विवाह सोहळ्यात पुढे काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »