29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
HomeKalyan-Dombivliवृद्धांच्या आधाराचं 'मायेचं घर', सुमेधा थत्तेने वृद्धांना दिले 'आपल घर'

वृद्धांच्या आधाराचं ‘मायेचं घर’, सुमेधा थत्तेने वृद्धांना दिले ‘आपल घर’

डोंबिवली (शंकर जाधव)

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात समाजसेवा करावीशी वाटते.कोणी दान करून तर कोणी आर्थिक मदत करून समाजसेवेत खारीचा वाटा उचलत असतो. डोंबिवलीतील एका तरुणीने वृद्धांची सेवा करण्याचा व्रत हाती घेतले. वृद्धांना आपलं घर मिळावं, घरातील सांभाळ करणारे आपले वाटावे अस ‘आपुलकीच घर’ बनवून सुमेधा थत्ते हिने वृद्धांची सेवा सुरू केली. सुमेधाची वृद्ध सेवेला पाहून मनसेने शाबासकीची थाप दिली. एवढेच नव्हे तर मनसे नेते तथा आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनीही वृद्धांश्रमाला भेट देऊन सुमेधाच्या समाजकार्याचे कौतुक केले.

डोंबिवली पश्चिमेकडील सरोवर नगर गरिबाचा वाडा येथे काही अंतर चालल्यावर उजव्या बाजूला चाळींच्या समोर झाडा- फुलांनी भरलेल्या जागेत ‘ साधना आधार वृद्ध सेवा केंद्र’ दिसते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर एक तुळस आणि समोरील गप्पा मारत बसलेले वृद्ध पाहून वाटत की आपण वृद्धाश्रमात नव्हे तर गावातील एका घरात आलोय.जिथे घरातील मंडळी सर्व दुःख विसरून एकमेकांना शब्दांचा आधार दिला जातो. मायेच्या स्पर्शाने ‘आपलं घर ‘ वाटावं अस घर पाहून हे वृद्धांना या घरातून जाण्याचा विचारही शिवत नाही.

लेकीचं प्रेम, बहिणीची माया, चुकलं की वडिलांसारखं रागावणं हे पाहून सुमेधावर वृद्धाश्रमातील प्रत्येक वृद्ध भारावून जातो.आपल्या घरची आठवण येते पण ती काही वेळेपुरती.. मग सुमेधाकडे पाहिलं की वाटत आपली काळजी घेणारे ते ‘मायेचे नयन’ डोळ्यातून आनंदाश्रू आणतात असे वृद्ध म्हणतात. सुमेधाचे वाढदिवस जणू या वृद्धांसाठी तो दिवस उत्सवच.. मग सकाळपासून ते वृद्ध सुमेधाताईंचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा कऱण्यासाठी तयारीला लागतात. वृद्ध स्वतः हे काम करताना पाहून सुमेधाच्या डोळ्यातून हलगतच बाहेर पडणारे आनंदाश्रू तिच्या जीवनातील वृद्धसेवेची जणू साक्षच देतात.

साधना आधार वृद्ध सेवेच्या आश्रमाच नूतनीकरण आणि सुमेधाताईंचा वाढदिवस एकाच दिवशी आल्याने वृद्धांनी दिवसभर कामाला जुंपून घेतलं.सुमेधाला शुभेच्छा देण्यासाठी आणि वृद्धांची भेट घेण्यात मनसे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे, दीपिका पेंडणेकर, प्रेम पाटील, शर्मिला लोंढे यांसह अनेकांनी आले होते.तर भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनीही वृद्धाश्रमाला भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »