अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरी (Mother Dairy) या दूध कंपनीनेही दुधाचे दर वाढवले आहेत. मदर डेअरीने दुधाच्या विविध प्रकारांमध्ये 2 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. आता मदर डेअरीचे दूध (Mother Dairy Milk price) खरेदी करताना ग्राहकांना दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. नवीन दर 6 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत.
दिल्ली-एनसीआरमधील सर्वात मोठी दूध पुरवठादार मदर डेअरीने सांगितले की, किमतीत वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढवले जात आहेत. अमूलने दरवाढ केल्यानंतर काही दिवसांनी मदर डेअरीने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, अमूलने १ मार्च २०२२ पासून देशभरात दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली होती.
नवीन किमती (रविवार, 6 मार्च) पासून लागू होतील.
मदर डेअरीने दुधाचे दर वाढवल्यानंतर 6 मार्चपासून मदर डेअरी टोन्ड दूध 49 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे, तर आधी 47 रुपये दर होता. आता दुहेरी टोन्ड दुधाची किंमत 41 रुपयांवरून 43 रुपये प्रति लिटर होणार आहे. मदर डेअरी फुल क्रीम दुधाची किंमत 57 रुपयांवरून 59 रुपये प्रति लिटर होणार आहे.
त्याचप्रमाणे मदर डेअरी बूथवर उपलब्ध असलेल्या टोन्ड दुधाची किंमत ४४ रुपयांऐवजी ४६ रुपये प्रतिलिटर असेल. त्याचबरोबर मदर डेअरीच्या गायीच्या दुधाची किंमत 49 रुपयांवरून 51 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
वाढलेल्या दरानंतर सुपर-टी दुधाचा अर्धा लिटर दर २६ रुपयांऐवजी २७ रुपयांवर पोहोचला आहे. अर्धा लिटर पॅकिंग असलेल्या फुल क्रीम दुधासाठी 30 रुपये, टोन्ड दुधासाठी 25 रुपये, दुहेरी टोन्ड दुधासाठी 22 रुपये आणि गायीच्या दुधासाठी 26 रुपये दर असतील.