सतत होत असणाऱ्या महागाई मध्ये आता दुधाचा (Milk rates) नंबर लागला आहे. दुधा मध्ये दरवाढ झाली आहे. प्रसिद्ध गोकुळ दूध (Gokul Milk) संघाकडून विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून प्रतिलिटर दूध विक्री दरात २ रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत यामुळे १ लिटर दुधाची किंमत ६६ रुपये इतकी झाली आहे. सर्वसामान्यांना या वाढीव दूध दराचा फटका नक्कीच बसणार आहे.
दूध खरेदी दरातही वाढ करण्यात आली असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा नफा होणार आहे. सध्या म्हशीच्या दूध खरेदीत २ रुपयांची तर गाईच्या दुधाला प्रतिलिटर १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. पशुखाद्य आणि इतर जनावरे सांभाळण्याचा खर्च जास्त प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर खरेदी दरात काहीशी वाढ करून दूध उत्पादकांना खूष करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे.