डोंबिवली (शंकर जाधव)
पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवलिकर एक सांस्कृतिक परिवार, कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे. त्या निमित्ताने वाहतूक नियंत्रण विभागाच्या साहाय्याने दिंडीचे आयोजकांसह शहरातील विविध शाळांनी एकत्र येत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हेही उपस्थित होते.
ज्ञानबा तुकाराम महाराज की जय, वाचाल तर वाचाल, वाचनाने जीवन होते समृद्ध अशा घोषणा देऊन शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडीत सहभागी होऊन वाचन संस्कृतीचे वारकरी होण्याची शपथ घेतली. वाहतूक नियंत्रण विभागाच्या साहाय्याने दिंडीचे आयोजकांसह शहरातील विविध शाळांनी एकत्र येत ग्रंथ दिंडी काढली. लायब्ररीचे पुंडलिक पै, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षा अलका मुतालिक, कार्यवाह प्रविण दुधे, विंदा भुस्कुटे, धनश्री साने, दीपाली काळे, सई बने, ओंकार इंटरनॅशनल स्कुलच्या पर्यवेक्षिका रोहिणी नाईक यांसह वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी त्यावेळी उपस्थित होते.
पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकातून चार रस्ता, लो.टिळक पुतळा, ब्राह्मण सभा, फडके पथ, गणपती मंदिर या मार्गे दिंडीचा समारोप झाला. इंदिरा गांधी चौकातून दिंडी निघताना विठ्ठल, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, लोकमान्य टिळक यांच्या पोषाखात आबालवृद्ध एकत्र आले, आणि त्यामुळे दिंडीला वेगळेपणा आला. पालखीत ज्ञानेश्वरी ठेवून माऊलीचा गजर करत दिंडी मार्गस्थ झाली. वाचन संस्कृतीचे वारकरी अस म्हणताना विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचण्याचा संकल्प।सोडला, आबालवृद्ध नागरिकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगणारे सुविचार सांगितले, आणि त्यामुळे दिंडीला साहित्य दिंडीचे स्वरूप आले होते. बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळ्यानिमित्त मंत्री चव्हाण, पै यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, आवर्जून भेट द्यावी आणि त्यातून पुस्तकाचे विश्व कसे असते ते बघावे असे वाटत असेल तर पुस्तक प्रेमी नागरिकांनी आवर्जून हभप सावळाराम महाराज क्रीडासंकुलात असलेल्या बंदिस्त क्रीडांगण येथे २० ते २९ जनेवारी दरम्यान सकाळी १० ते रातर्क १० यावेळेत जावे असे आवाहन करण्यात आले.
गणेश मंदिरात पालखीची आरती, गणेश वंदन, सोहळ्याचा संकल्प सोडण्यात आला आणि त्यानंतर गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात दिंडी समाप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. शहरात आठवडाभर विविध ठिकाणी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्रामुख्याने शहरातील ४० शाळांच्या सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी निघालेल्या दिंडीत सहभाग घेतला होता. पालक, विद्यार्थी शिक्षक यांच्यात त्यामुळे जल्लोषाचे वातावरण होते.