डोंबिवली ( शंकर जाधव ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दहीहंडी उत्सवासाठी बोटीने डोंबिवलीत आले होते. आता पुन्हा नवरात्रोत्सवासाठी डोंबिवली पूर्वेकडील एका नवरात्रोत्सव कार्यक्रमाला येणार आहे. यावर मनसेने मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती करत केली आहे. शहरातील सर्व नवरात्रो मांडला भेट द्या. निदान आपल्या येण्याने तरी शहरातील खड्डे प्रशासन बुजवतील आणि नागरिकाना चांगले रस्ते दिसतील
अशी विनंती केली.
पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे डोंबिवलीत पाहणी करण्यासाठी येणार असल्याची वार्ता समजतात प्रशासनाने रस्त्यातील माती काढण्यास सुरुवात केली. तर डोंबिवली विभागाय कार्यालयाचा आवर स्वच्छ करण्यात आला. पालिका आयुक्तांपासून ते मंत्री शहराती आले कि रस्ते चकाचक केले जातात. मात्र नागरिकांसाठी चांगले रस्ते देणे आपली जबाबदारी असल्याचा विसर प्रशासना पडला आहे. याची आठवण करून देत मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती केली.
याबाबत मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष घरत म्हणाले, डोंबिवलीतील एका नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी डोंबिवलीतील सर्व नवरात्रोत्सव मंडळाला भेट द्यावी. निदान मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटी मुळे शहरातील सर्व रस्ते चांगले स्थितीत दिसतील. जर शहरात मंत्री येणार येणार असल्याचे माहिती दिली मिळताच रस्त्याची मलमपट्टी होणार असेल तर दररोज एका मंत्र्याने डोंबिवलीत यावे असे घरत म्हणाले. मनसेच्या विनंतीची चर्चा शहरात होणार हे नक्की.मनसेच्या या विनंतीवर डोंबिवलीकर खुश असून प्रशासना कडून नाराजीचा सूर उमटणार आहे.