डोंबिवली (शंकर जाधव)
मावस बहिणीने घरात चोरी केल्याची घटना डोंबिवली जवळील पलावा येथे घडली.मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत २४ तासात मावस बहिणीला अटक केली. पर्स मधील चावी चोरून तिने घरातील २०लाख रुपये किमतीचे चारशे ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले होते. पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, सिमरन पाटील (२७) असे अटक केलेल्या मावस बहिणीचे नाव आहे. फिर्यादी प्रिया सक्सेना हिच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पै फ्रेंड्स लायब्ररीचा ४.५० लाख पुस्तकांपर्यंतचा प्रवास
13 जानेवारी रोजी प्रिया सक्सेना या एका कार्यक्रमासाठी कामोठे नवी मुंबई येथे गेल्या होत्या. मावस बहीण सिमरन यांनी प्रिया यांच्या नकळत पर्स मधून घराची व तिजोरीची चावी काढून घेतली होती. त्यानंतर सिमरन ही प्रिया यांच्या घरी गेली. आपला चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात दिसू नये म्हणून तिने चेहऱ्याला स्कार्फ बांधला. त्यानंतर चावीने टाळा उघडून घरात प्रवेश केला. तिने घरातील कपाटात तिजोरीच्या चावीने त्यांनी तिजोरी उघडली. यावेळी प्रिया यांच्या तिजोरीतील सुमारे 400 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले. काही वेळाने घरी आल्यानंतर प्रिया यांना घरी चोरी झाल्याचे समजताच मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे 24 तासाच्या आत सिमरनला अटक केली.
कल्याण येथील आबोली रिक्षा आणि मोटर ट्रेनिंग स्कूलची रॅली
अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे,पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, दीपक गडगे,पोलीस नाईक प्रवीण किनरे,महादेव पवार, शांताराम कसबे, खैरनार, हिले, महेंद्र मंझा, संजय मसाळ, सोमनाथ टिकेकर,गिरीश पाटील,अशोक आहेर,विजय आव्हाड,पोलीस नाईक गणेश नाईक यांनी कामगिरी केली.