महाराष्ट्रातील मुंबई शहरातील बांद्रा पश्चिम येथील शास्त्री नगर येथे दोन मजली (G+2) इमारत कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, बीएमसीने सांगितले की, अपघातानंतर लोकांचे बचावकार्य सुरू आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी एएनआयला सांगितले की, आज रात्री 12.15 च्या सुमारास इमारत कोसळली.१६ जण दवाखान्यात दाखल असून ते आता सुरक्षित आहेत आणि एक जण मृत्युमुखी पडला आहे . हे सर्व बिहारमधील मजूर आहेत.

बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दल आणि अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, पोलीस, एक रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. ढिगाऱ्याखाली 3 ते 4 लोक अडकल्याची शक्यता बीएमसीने (BMC) व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत बचावकार्य सुरू आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट (Tweet) करून या घटनेची माहिती दिली. ट्विट करताना त्यांनी लिहिले की, नुकतेच वांद्रे पश्चिमेतील इमारत कोसळल्याबद्दल ऐकले. बीएमसीची टीम आणि अग्निशमन दल घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.
As per updates from AMO of Bhabha hospital to disaster management team of @mybmc as well as zonal DCP, @MumbaiPolice one person has unfortunately lost life in the Bandra West house collapse. 16 patients are admitted so far with minor injuries & I pray for their speedy recovery https://t.co/PthvO6MhsH
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 8, 2022
तसेच हॉस्पिटलमधून जखमींची नेमकी संख्या वाट पाहत असल्याचेही लिहिले. ते सर्व लवकरात लवकर बरे होतील अशी आशा. अपडेट्ससाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणार आहे. याशिवाय, त्यांनी ट्विट करून लिहिले की, भाभा रुग्णालयाच्या AMO कडून आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अपडेटनुसार, वांद्रे वेस्ट हाऊस कोसळल्यामुळे एका व्यक्तीला दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 16 रुग्णांना किरकोळ दुखापतीसह दाखल करण्यात आले असून ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.