31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत ; येणारे काही दिवस धोक्याचे

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत ; येणारे काही दिवस धोक्याचे

मुंबईसह (Mumbai) मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या ठाणे, नवी मुंबई शहरात आज पहाटेपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेला बसला आहे. लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईसोबत सर्वच शहरांत रविवारपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. परिणामी लोकल वेळापत्रक विस्कळीत झाले होते. सोमवार नंतर आज पहाटेपासून तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. परिणामी मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण, हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलही दहा मिनिटे विलंबाने होत आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांना (Local train) गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला, विद्याविहार, सायन यासह काही स्थानकांच्या बाहेर, तर रुळांच्या आजूबाजूलाही पाणी साचले आहे. पाऊस दिवसभर सुरु राहिल्यास लोकल वेळापत्रक आणखी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या शुक्रवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विभागाच्या 5 दिवसांच्या अंदाजात असे सांगण्यात आले आहे की शुक्रवारपर्यंत मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस पडू शकतो. परिस्थिती पाहता एनडीआरएफची टीम अनेक ठिकाणी आधीच तैनात करण्यात आली आहे. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सतर्क राहून खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नद्यांच्या पातळीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

मुंबईतही सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात खूप पाणी साचले होते. वृत्तानुसार, सकाळी 8.30 ते संध्याकाळी 8.30 पर्यंत, कुलाबा वेधशाळेत 66.4 मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझमध्ये 40.4 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच ठाणे आणि नवी मुंबईतही बराच वेळ जोरदार पाऊस झाला. हा पाऊस रात्रभर सुरु असल्याने सकाळी अनेक भागात पाणी तुंबलेले दिसले.

येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आणि नद्यांची स्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वृत्तानुसार, मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफची टीम अनेक भागात तैनात करण्यात आली आहे. मुंबई व्यतिरिक्त नागपूर, चिपळूण, रत्नागिरी, महाड आणि रायगडमध्येही एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

मुंबईसह इतर भागात देखील पावसाचा तडाखा ; काय आहे आत्ताचे अपडेट ?

पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढण्याचाही धोका आहे. TOI च्या म्हणण्यानुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांच्या पाण्याची पातळी सोमवारी 13 टक्क्यांनी वाढली, ती आठवड्याच्या शेवटी 11 टक्क्यांवरून वाढली. त्यात आणखी वाढ होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दर पावसाळ्यात मुंबईतील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. रस्ते बुडतात त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण होते असेच काही यावेळेस ही झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »