29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी नारायण राणेंना जीवे मारण्याची धमकी? नितेश राणे यांनी ट्विट करताच सर्वत्र खळबळ

नारायण राणेंना जीवे मारण्याची धमकी? नितेश राणे यांनी ट्विट करताच सर्वत्र खळबळ

मागील काही दिवसांपासून नितेश राणे (Nitesh Rane) विरोधकांवर कडाडून टीका करताना दिसत आहेत. ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून ते विरोधकांचा जो समाचार घेतात त्यातून त्यांचा आक्रमकपणा बघायला मिळतो. नुकतंच नितेश राणे यांनी एक ट्विट खळबळजनक दावा केला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना (Shivsena) सोडली होती तेव्हा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती असे त्या ट्विट मध्ये त्यांनी लिहिले आहे.

म्याव म्याव संपूदे मग आपण व्याजासहित वस्रहरणाला सुरुवात करू असे देखील त्यांनी म्हटले आहे. जेव्हा एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना सुरक्षा पुरवू नका अशी सुचना दिल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरुक्षा देण्यात आली होती. त्यांना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरुक्षा वाढवण्यात आली होती.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सुचना नव्हत्या. सार्वजनिक जीवनात काम करत असताना अशा धमक्या नेहमीच येत असतात. एकनाथ शिंदेंच्या मुलाने पत्र दिल्यानंतर जेवढी सुरक्षा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना होती तेवढीच सुरक्षा एकनाथ शिंदेंना देण्यात आली होती. एकनाथ शिदे आणि शंभुराजे देसाई एकाच गटातील आहेत म्हणून ते आरोप करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »