लॉकडाऊन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाटकं आणि सिनेमे लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहेत. वेगळा विषय आणि वेगळी मांडणी नेहमीच प्रेक्षकांना सिनेमागृह किंवा नाट्यगृहाकडे यायला भाग पाडत असते. असाच प्रत्यय सध्या फ्रेमफायर स्टुडिओ आणि स्वामी नाट्यगंण यांच्या कलाकृतीमध्ये सर्वसामान्य प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. भगदाड आणि नवरा आला वेशीपाशी या दोन वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण ‘नाट्यदिंडी‘ या संकल्पनेतून पार पडत आहे.

कल्याण (Kalyan) येथील अत्रे नाट्यगृह मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर आता ही दिंडी मुलुंड (Mulund) येथील कालिदास नाट्यमंदिर येथे येत आहे, म्हणजेच या नाटकांचा प्रयोग येत्या शनिवारी १६ जुलै ला दुपारी ४ वाजता होणार आहे.
अभिषेक गावकर लिखित आणि यश नवले दिग्दर्शित, भगदाड ही द. मा. मिरासदार यांच्या कथेवर आधारित एक धमाल एकांकिका आहे. उत्तम सादरीकरण, योग्य संगीत, वेशभूषा अशा सगळ्या गोष्टींनी नटलेली ही कलाकृती महाराष्ट्रातील अनेक पारितोषिके आपल्या नावावर करून झाली आहे.
विशेष म्हणजे तुम्हाला हे दोन्ही प्रयोग एकाच तिकिटामध्ये पाहता येणार आहेत.
या नाट्यदिंडीमध्ये सामील होण्यासाठी म्हणजेच नाटक पाहण्यासाठी तुमचे तिकीट आजच बुक करा.
कुठे – महाकवी कालिदास नाट्यमंदिर मुलुंड पश्चिम
कधी – १६ जुलै
केव्हा – दुपारी ४ वाजता
तिकीट बुकिंग करण्यासाठी संपर्क
चैतन्य – +९१ ८१०४ ०६२४ ९८
रोशन – +९१ ९०८२ ०६४० ८१
