ऐरोली सेक्टर १९ (Airoli Sector 19) मध्ये JVM मेहता कॉलेज ऑडिटोरियम येथे मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था नवी मुंबई, निर्मित माळरानावर फुललेलं नाटक ‘आय. एम. पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ या नाटकाचा प्रयोग २ ऑगस्ट रोजी ठाणे (Thane) येथील गडकरी नाट्यगृहात आणि त्या नंतर १६ ऑगस्ट रोजी विष्णुदास भावे, वाशी (Vashi) येथे सादर होणार आहे. सदर नाटक (Drama) हे फासेपारधी समाजावर आधारित असून समाजातील एक बाजू उलगडण्याचा प्रयत्न यातून होतो.

नाटकाचे लेखक प्रशांत निगडे यांच्या लेखणीतून आलेल्या केवळ एका प्रश्नामुळे सबंध नाटकाचा पाया रचला गेला आहे. ” गरीब कोण? जो कागदपत्रे दाखवून गरीब असल्याचे सांगत राहतो तो, की ज्याची नोंदच नाही तो? या एका प्रश्नावर संपूर्ण नाटकाची उभारणी करण्यात आली आहे. लेखना सोबतच नाटकाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि प्रमुख भूमिका देखील प्रशांत निगडे यांनी साकारली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनालय आयोजित ६०व्या राज्यनाट्य स्पर्धेत मुंबई आणि अंतिम फेरीसह या नाटकाला एकूण १० पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यासोबतच नाटकातील तिन्ही कलावंत या स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. अभिनेते प्रसाद पंडित, ज्ञानेश वाडेकर, रवी वाडकर, आदित्य हळबे, संदीप जंगम, संगीतकार सदानंद गोळे, आर. जे. नेहा वझे अशा दिग्गज कलाकारांनी नाटकाला हजेरी लावून कलाकारांचे भरभरून कौतुक केले आहे.

उत्तम लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा, निर्मिती अशा प्रत्येकच विभागात पुरस्काराने सन्मानित नाट्याविष्काराची अनुभूती घ्यायला जरूर हजेरी लावा आणि लेखकाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या.
- कधी ? – २ ऑगस्ट
- कुठे ? – गडकरी रंगायतन, ठाणे
- केव्हा ? – दुपारी ४:३० वाजता
- कधी ? – १६ ऑगस्ट
- कुठे ? – विष्णुदास भावे, वाशी
- केव्हा ? – दुपारी ४ वाजता
- तिकिटासाठी संपर्क –
- ८१०४ ६०७० २३
- ९१३७ ९७१४ ३७