29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeखेळनीरज चोप्राची आणखी एक जबरदस्त कामगिरी, पुन्हा उंचावले भारताचे नाव

नीरज चोप्राची आणखी एक जबरदस्त कामगिरी, पुन्हा उंचावले भारताचे नाव

भारताला (INDIA) सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिलेला भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केले आहे. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा हा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपद जिंकले.

युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान कायम केलं होतं. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नावेळी नीरज चोप्राने ८८.१३ मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्यपदकावर आपले नाव कोरले. २४ वर्षीय नीरजने अग्रस्थान मिळवले असते तर ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरला असता.

दरम्यान ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरावर भालाफेक करत पहिलं स्थान पटकावलं. पहिल्या प्रयत्नात त्याने ९०.२१ मीटर आणि त्यानंतर ९०.४६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. सहाव्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली आणि सुवर्णपदाचा मानकरी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »