डोंबिवली (शंकर जाधव) जम्मू –कश्मीरची स्थिती देशाच्या स्वातंत्र्यपूर्वी फार वेगळी होती.मात्र स्वातंत्र्यांनंतर ही येथील नागरिकांना संघर्ष करावा लागत होता.२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर देशाला चांगले दिवस आले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारतीय संविधानातील ३७० या कलमामधे फेरफार करण्यात आले. तसेच ३५ अ हे पोटकलम रद्द करण्यात आले. जम्मू-कश्मीर मधील नागरिकांनीच नव्हे तर देशातील प्रत्येकाने आनंद व्यक्त केला. त्यामुळे केंद्रात यापुढे कोणाचीही सत्ता आली तरी ३७० कलम व ३५ अ पोटकलम पुन्हा लागू करू शकणार नाही असा विश्वास हम चॅरिटेबल ट्रस्ट च्या कामानिमित्त जम्मू-कश्मीरचा प्रवास केलेले अभ्यासक जयंत पित्रे यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात व्यक्त केला.
१९४७ च्या स्वातंत्र्य लढ्यापासून जम्मू-कश्मीर मधे घडत गेलेली स्थित्यंतरे आणि ५ ऑगस्ट २०१९ च्या ऐतिहासिक निर्णयानंतरची जम्मू-कश्मीर मधील परिस्थिती या विषयावर अभ्यासक जयंत पित्रे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहात भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली पूर्व मंडळ व व्योम संस्था, डोंबिवलीयांच्या विशेष सहकार्याने व्याख्यान भरविल्यात आले होते. यावेळी पित्रे यांनी सुरुवातीला मोदि सरकारचे आभार मानत जम्मू-कश्मीर मध्ये याची फार आवश्यकता असल्याचे सांगितले.

पित्रे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर जम्मू-कश्मीरचा ४५ टक्के भाग भारतात आला. मात्र यातही तेथील नागरिकांचा जगण्याचा संघर्ष संपत नव्हता. विभागलेल्या जम्मू-कश्मीर मधील नागरिकांना अत्यंत दडपणात जगावे लागले होते. जम्मू-कश्मीर मधील संस्थांची सामील करार पासून ते आताच्या परिस्थितीवर पित्रे यांनी भाष्य करताना येथील कश्मीरी पंडितांवर अन्याय होत असल्याचे थोडक्यात माहिती दिली. ३७० कलम व ३५ अ पोटकलम रद्द झाल्याने प्रत्येक नागरीक मोदी सरकारचे आभार मानत आहे.त्या ठिकाणी उदोजकांनी गुंतवणूक केल्यास व जमिनी विकत घेतल्यास येथील कश्मीर पंडितांना आधार मिळेत आणि त्यांना सुरक्षित असल्याचे समाधान मिळू शकेल.त्यांनाही भारतीय प्रवाहात सामील होत येईल अशी प्रत्येक भारतीयांनी जबाबदारी आहे. याच माध्यमातून आमचे काम सुरु असते. जम्मू-कश्मीर मधील मुलांचा शिक्षणाचा मुख्य प्रश्न असून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पआणणे आवश्यक आहे.या कार्यक्रमात भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक विश्वजित पवार, मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर,भाजप डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील. एॅड.माधुरी जोशी,वर्षा परमार,मनोज पाटील, सुरेश पुराणिक आधी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी अमित देवस्थळी यांनी केली.