29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
HomeKalyan-DombivliOlympics Football Tournament : डोंबिवलीतील गतिमंद शाळेतील विद्यार्थिनी सेजल जेसवाल जर्मनीमध्ये चमकणार

Olympics Football Tournament : डोंबिवलीतील गतिमंद शाळेतील विद्यार्थिनी सेजल जेसवाल जर्मनीमध्ये चमकणार

डोंबिवली (शंकर जाधव)

चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेत गतिमंद मुला-मुलांनाही आपला खेळ खेळता यावा यासाठी संधी दिली जाते. पुढील महिन्यात जर्मनी येथे होणाऱ्या स्पेशल ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेत भारतातील फुटबॉल संघात डोंबिवलीतील क्षितीज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेतील १६ वर्षीय विद्यार्थिनी सेजल सुरजचंद्र जेसवाल हिची निवड झाली आहे. या स्पर्धेत भारतातील संघातून सेंजल खेळणार आहे. स्पर्धेत खेळताना संघातील इतर खेळाडूंबरोबर संघभावना राहावी म्हणून दोनदा झारखंड, एकदा कोल्हापूर आणि एकदा गुजरात येथे सरावाकरता गेली होती.

कुत्र्यापासून वाचण्यासाठी डिलीव्हरी बॉयने उचलले धक्कादायक पाऊल, उपचारादरम्यान मृत्यु

दिव्यात राहणाऱ्या सेंजलचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील क्षिजित संचालित गतिमंद मुलांच्या शाळेत पूर्व प्राथमिक वर्गात शिकतेय. २०१८ ला ठाण्याला पार पडलेल्या स्पेशल ऑलिंपिक कॅपमध्ये संस्थेच्या अध्यक्षा अनिता दळवी, दीपक साळुंखे यांसह शिक्षकांनी सेजला कॅप घेऊन गेले असता तिची फुटबॉल खेळाची आवड व तीचा खेळ पाहून तिला संधी देण्याचे ठरविले. आधी तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय स्तरावर सेंजलने अनेक पदके पटकाविली.पुढील महिन्यात होणाऱ्या जर्मनीला स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेत खेळण्यासाठी जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »