डोंबिवली ( शंकर जाधव ) नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश मंदिराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज श्री गणेश मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला. सकाळी ७ वाजता मंदिराच्या गाभाऱ्यात दोनशे जणांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. यात सगळ्यांनी मिळून अथर्वशीर्षाची एकूण २१ आवर्तने केली. त्यानंतर श्रींची आरती झाली आणि अथर्वशीर्ष पठणात सहभागी झालेल्या सगळ्यांना श्रींचा प्रसाद देण्यात आला.